नोकरीचे आमिष तब्बल 6 लाखांची फसवणूक; टेलिग्राम अॅपवर ती जाहिरात पाहिली अन्...
देवळा / बाबा पवार
सायबर फ्रॉड आणि फसवणुकीच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच घटना देवळा तालुक्यात घडली आहे. स्मार्टफोनवर येणारी एक छोटीशी ‘APK’ फाइल किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय देवळा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना आला आहे. या शेतकऱ्यांच्या स्मार्टफोनवर एक फाइल आली आणि ही फाइल ओपन करताच त्यांनी त्यांच्या कष्टाचे लाखो रुपये गमावल्याची घटना देवळा तालुक्यात घडली आहे. देवळा तालुक्यातील या शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाचे तब्बल ४ लाख ९२ हजार रुपये गमावले आहेत.
मेशी येथील शेतकरी सुरेश बोरसे यांच्या मोबाईलवर एक अज्ञात ‘APK’ फाइल आली. त्यांनी ती फाइल डाउनलोड केली. यानंतर त्यांच्या बँक खात्यातून आधी ३ लाख रुपये आणि नंतर ७७ हजार रुपये, असे एकूण ३ लाख ७७ हजार रुपये अचानक गायब झाले. दुसऱ्या घटनेत, वरवंडी येथील हेमंत शिंदे यांना त्यांच्या मोबाईलवर ‘आरटीओ ट्रॅफिक चलन’ संदर्भात एक संदेश आला. यामध्ये देखील एक फाइल जोडलेली होती. त्यांनी ही ‘APK’ फाइल उघडली आणि क्षणार्धात त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १५ हजार रुपये डेबिट झाले. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
‘APK’ (Android Package Kit) ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन्सची एक फाइल आहे. आपण जेव्हा प्ले स्टोअरवरून कोणतीही ॲप डाउनलोड करतो, तेव्हा प्रत्यक्षात हीच ‘APK’ फाइल आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल होते. परंतु, जेव्हा ही ‘APK’ फाइल अज्ञात किंवा अविश्वसनीय स्त्रोतांकडून येते, तेव्हा ती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
सायबर गुन्हेगार या ‘APK’ फाइल्समध्ये मालवेअर किंवा स्पायवेअर दडवून ठेवतात. तुम्ही अशी फाइल डाउनलोड करून इन्स्टॉल केली, की हे धोकादायक सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये सक्रिय होते. याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या फोनमधील गोपनीय माहिती, जसे की बँक खात्याचे तपशील, पासवर्ड, ओटीपी आणि इतर संवेदनशील डेटा चोरू शकतात. तुमची माहिती हॅकर्सच्या हाती लागली की तुमच्या बँक खात्यातून पैसे काढणं अगदी सहज सोपं होतं.
अनोळखी APK फाइल्सपासून दूर राहा: कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून किंवा अविश्वसनीय स्त्रोतांकडून आलेल्या ‘APK’ फाइल्स किंवा लिंक्सवर कधीही क्लिक करू नका किंवा त्या डाउनलोड करू नका.व्हाट्सअॅपचे ऑटो डाउनलोड हा पर्याय बंद करा. तसेच कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या फाइल्स, फोटो अशा कुठल्याही गोष्टी डाउनलोड करू नका.
ॲप्स फक्त प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा: ॲप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमी Google Play Store (अँड्रॉइडसाठी) किंवा Apple App Store (आयओएससाठी) या अधिकृत स्टोअर्सचाच वापर करा. इतर कोणत्याही वेबसाइटवरून ॲप्स डाउनलोड करणे टाळा.
संदिग्ध मेसेजपासून सावध रहा: “तुमचे चलन बाकी आहे”, “तुमचे लॉटरी जिंकले आहे”, “बँक खाते बंद होईल”, अशा प्रकारच्या कोणत्याही अज्ञात आणि आकर्षक मेसेजला बळी पडू नका. बँका, सरकारी संस्था किंवा इतर कोणतीही अधिकृत संस्था तुम्हाला अशा प्रकारच्या लिंक्स पाठवून माहिती विचारत नाहीत.
सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा: तुमच्या स्मार्टफोनमधील ऑपरेटिंग सिस्टिम आणि इतर ॲप्स नेहमी अपडेट ठेवा. अपडेट्समध्ये सुरक्षेसंबंधीचे महत्त्वाचे पॅचेस असतात, जे तुमच्या फोनला नवीन धोक्यांपासून वाचवतात.
उत्तम अँटीव्हायरस वापरा: तुमच्या स्मार्टफोनवर चांगल्या प्रतिचा मोबाईल अँटीव्हायरस इन्स्टॉल करा आणि तो नियमितपणे स्कॅन करत रहा.
माहितीची पडताळणी करा: जर तुम्हाला एखाद्या बँकेकडून, सरकारी विभागाकडून किंवा इतर संस्थेकडून काही संशयास्पद मेसेज किंवा कॉल आला, तर थेट त्यांच्या अधिकृत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधून माहितीची पडताळणी करा. मेसेजमधील नंबरवर किंवा लिंकवर क्लिक करू नका.
ओटीपी शेअर करू नका: बँक व्यवहार करताना येणारा ओटीपी हा तुमच्या व्यवहाराची अंतिम खात्री असतो. हा ओटीपी कोणासोबतही शेअर करू नका, अगदी बँकेचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीसोबतही नाही.