
Upcoming Smartphone In December: स्मार्टफोन अपग्रेडची वेळ आली! या महिन्यात 'हे' मॉडेल्स करणार एंट्री, यादी वाचून थक्क व्हाल
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वीवो त्यांची Vivo X300 सीरीज लाँच करणार आहे. ही स्मार्टफोन सिरीज 2 डिसेंबर रोजी लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी X300 आणि X300 Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट असणार आहे. यासोबतच कंपनीच्या या आगामी स्मार्टफोन्समध्ये VS1 चिप आणि V3 प्लस इमेजिंग चिप देखील असणार आहे, ज्यामुळे कॅमेरा परफॉर्मंस नेक्स्ट लेवलवर जाणार आहे. या आगामी फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Xiaomi देखील डिसेंबर महिन्याच्या पहिला आठवड्यात Redmi 15c लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 4G आणि 5G अशा दोन व्हेरिअंटचा समावेश आहे. 4G मॉडेलमध्ये हीलियो G81 अल्ट्रा प्रोसेसर दिला जाणार आहे, तर 5G मॉडेलमध्ये Dimensity 6300 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये 6000mAh मोठी बॅटरी असणार आहे, जी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. भारतात या फोनची सुरुवातीची किंमत 12 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
OnePlus देखील डिसेंबर महिन्यात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. 17 डिसेंबर रोजी OnePlus 15R स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 चिपसेट दिला जाणार आहे. हा आगामी स्मार्टफोन चारकोल ब्लॅक आणि मिन्ट ब्रिझ या रंगात लाँच केला जाणार आहे आणि याची विक्री Amazon द्वारे केली जाणार आहे. OnePlus या ईव्हेंटमध्ये OnePlus Pad Go 2 देखील लाँच करणार आहे. या फोनची किंमत 50 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
Realme देखील डिसेंबर महिन्यात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. 4 डिसेंबर रोजी Realme P4x स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. हे डिव्हाईस फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेकच्या 7400 अल्ट्रा चिपसेटने सुसज्ज असणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144 Hz डिस्प्ले आणि 7000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.
Oppo ने अलीकडेच Reno 15 सीरीजच्या लाँचिंगवेळी Reno 15C ला देखील टीज केले होते. यावरून असे सूचित होते की हा फोन डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच होऊ शकतो, परंतु तो भारतात हा स्मार्टफोन नक्की कधी लाँच होणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती नाही. Oppo हा फोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे.
Ans: या महिन्यात Samsung, Vivo, Xiaomi, iQOO, OnePlus, आणि Nothing या ब्रँड्सचे नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. लिस्ट ब्रँडनुसार बदलत राहते.
Ans: Samsung, OnePlus, iQOO आणि Xiaomi चे फ्लॅगशिप किंवा मिड-रेंज मॉडेल्स सर्वाधिक चर्चेत असतात.
Ans: iQOO, Poco, आणि Nubia RedMagic सारख्या ब्रँड्सचे गेमिंग-फोकस्ड मॉडेल्स सर्वाधिक चर्चेत असतात.