
New Year 2026: दणक्यात होणार नवीन वर्षाची सुरुवात! Oppo पासून Vivo पर्यंत जानेवारीमध्ये मार्केट गाजवणार 'हे' स्मार्टफोन्स
Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण
चाइनीज कंपनी शाओमी त्यांची रेडमी नोट सीरीज पुन्हा एकदा घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. 6 जानेवारी रोजी Redmi Note 15 लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जनरल 3 प्रोसेसर आणि 108MP चा मुख्य कॅमेका दिला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 25,000 रुपये असण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
OPPO Reno 15 सीरीज चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आली आहे. आता ही सिरीज भारतात देखील लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. 8 जानेवारी रोजी OPPO Reno 15 सीरीज भारतात लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये Oppo Reno 15, Reno 15 Pro आणि Reno 15 Pro Mini या मॉडेल्सचा समावेश असणार आहे. याची सुरुवातीची किंमत 40,000 रुपये असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन लेटेस्ट फीचर्सने सुसज्ज असणार आहे.
अलीकडेच हा स्मार्टफोन एका सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट करण्यात आला आहे. ज्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा स्मार्टफोन जानेवारी अखेरपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये 6.31 इंच OLED LTPO डिस्प्ले मिळणार आहे आणि हा स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या रियरमध्ये 50MP + 8MP + 50MP चा ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला 50MP लेंस असण्याची शक्यता आहे. याची किंमत अद्याप समोर आली नाही.
Vivo V70 स्मार्टफोन देखील जानेवारी महिन्यात भारतात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच डिस्प्ले असणार आहे. हा फोन 8GB+256GB आणि 12GB+256GB व्हेरिअंंटमध्ये भारतात लाँच केला जाणार आहे. याची सुरुवातीची किंमत 45,000 रुपये असू शकते.