Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण
नुकतेच समोर आले आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 52 गावांचे लोकेशन गुगल मॅपवर चुकीचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या गावांचा पत्ता शोधणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुगल मॅपवर विश्वास ठेवून अनेक लोकं त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतात. मात्र गुगल मॅपवरील गोंधळामुळे नागरिकांच्या समस्या प्रचंड वाढव आहे. गुगल मॅपवर दाखवले जाणारे चुकीचे लोकेशनमुळे प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. गुगल सर्च इंजिनवर कोरपना तालुक्यातील ५२ हून अधिक गावाचे लोकेशन चुकीचे दर्शवले आहे. त्यामुळे गुगलच्या आधारावरून माहिती घेणाऱ्यांना चुकीची माहिती मिळत असल्याचा प्रकार प्रस्तूत प्रतिनिधीच्या शोधातून सामोरे आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यात भारोसा, जेवरा, भोयेगाव, कोराडी, धुनकी, कुकुडसाथ, कारवा, धामणगाव, इंजापूर, झुलबर्डी, वडगाव, खिर्डी, चिंचोली, बेलगाव, चिंच खोड, एकोडी, कविटगाव, बोरगाव (इरई), तामसी, इरई, मांगलहिरा, थिप्पा, उमरहिरा, जांभूळधरा, सावलहिरा, चनई बुद्रुक, चनई खुर्द, मांडवा, पारडी, जेवरा (कन्हाळगाव), अकोला, मेहंदी, टांगाळा, हातलोणी, खैरगाव (कन्हाळगाव), केरामबोडी, कुकुडबोडी, बोरगाव बूज, बोरगाव खुर्द, कारगाव बुद्रुक, येरगव्हाण, कोडशी बूज, तांबडी, हेटी, लोणी, देवघाट रिठ, गणेशमोड रिठ, शिवनारांडा, सोनुलीं (गाडेगाव), बोरी नवेगाव, कढोली खुर्द, चिच नवेगाव आदी गावाचा समावेश आहे. यातील काही गावाचे लोकेशन गावाच्या थोड्या अंतरावर तर काही गावांचे लोकेशन भलतीकडेच दर्शविले. त्यामुळे नवीन व्यक्तींना गुगलचा आधार अचूकरित्या माहितीसाठी मिळत नाही. विशेष म्हणजे मोठी आणि महत्त्वाची गावाचे लोकेशन चुकले असल्याने गुगलने अपडेट करून अचूक सुधारणा करणे अपेक्षित आहे.
तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागात वसलेली कोल्हापूरगुडा, मायकलपूर, पाकडहिरा, निजामगोंदी, राजूरगुडा, गांधीनगर, रामपूर, कमलापूर, येरगव्हाण गुडा, हनुमान गुडा, जामगाव, भरकी गुडा, पांडव गुडा, परसोडा गुडा, तुकडोजीनगर, पारधीगुडा, भोईगुडा, लालगुडा आदी गावे गुगलच्या नकाशातच नसल्याने ही स्थाने शोधायची कसे असा यक्ष प्रश्न पडतोय.






