Upcoming Smartphone: नवीन स्मार्टफोन खरेदी करायचाय? थोडा धीर धरा, हे आहेत मार्चमध्ये लाँच होणारे ब्रँड न्यू मॉडल्स
फेब्रुवारीप्रमाणेच मार्च महिना देखील स्मार्टफोन प्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे. कारण या महिन्यात देखील अनेक नवीन प्रिमियम स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात टेक जायंट अॅपलचा आयफोन 16E लाँच करण्यात आला होता. हा या वर्षातील कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. याशिवाय Vivo V50, Galaxy A06 5G, Huawei Mate XT Ultimate Design, Realme P3 Pro 5G, असे अनेक स्मार्टफोन्स फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आले.
आता मार्चमध्ये देखील अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मार्च महिना स्मार्टफोन प्रेमींसाठीही खास असणार आहे. नथिंग आणि सॅमसंगसह इतर अनेक कंपन्या मार्चमध्ये त्यांचे नवीन मॉडेल लाँच करणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर मार्चमध्ये तुमच्यासाठी अनेक नवीन पर्याय उपलब्ध असतील. ज्यामध्ये Nothing Phone 3a, iQOO Neo 10R 5G, Vivo T4x 5G, POCO M7 5G यांचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
४ मार्च रोजी Nothing ने एका ईव्हेंटचं आयोजन केलं आहे. कंपनी या ईव्हेंटमध्ये Nothing Phone 3a सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये Nothing Phone 3a आणि Nothing Phone 3a प्रो मॉडल लाँच केले जाऊ शकतात. टीझरमध्ये असे दिसून आले आहे की या दोन्ही मॉडेल्सना Phone 2a आणि 2a Plus च्या तुलनेत नवीन लूक आणि अपग्रेड केलेले फीचर्स दिले जातील. Nothing Phone 3a प्रो मध्ये 50MP पेरिस्कोप कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.
मिड रेंज सेगमेंटमध्ये iQOO मार्ट महिन्यात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने म्हटले आहे की ते 11 मार्च रोजी iQOO Neo 10R 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे आणि तो Amazon द्वारे विकला जाईल. त्याची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. यात 6.78 -इंचाचा OLED डिस्प्ले आणि Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. त्याच्या मागील बाजूस 50MP मुख्य सेन्सर दिला जाऊ शकतो.
मार्चमध्ये Vivo T4x 5G स्मार्टफोन देखील लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने त्याचा टीझर लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.72-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300, 50MP मुख्य सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेट आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी असेल असे समोर आले आहे. त्याची लाँच तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
सॅमसंग मार्चमध्ये तीन नवीन फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की गॅलेक्सी A सिरीजमधील तीन नवीन स्मार्टफोन 2 मार्च रोजी भारतात लाँच केले जातील. टीझरमध्ये असे दिसून आले आहे की हे फोन मेटल फ्रेमसह येऊ शकतात. असे मानले जात आहे की कंपनी Galaxy A36 आणि Galaxy A56 सोबत Galaxy A26 स्मार्टफोन लाँच करू शकते.
Xiaomi च्या सब-ब्रँड POCO ने भारतात POCO M7 5G च्या लाँचिंगची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. हा नवीन स्मार्टफोन 3 मार्च रोजी लाँच होईल. कंपनीने दावा केला आहे की हा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा पहिला स्मार्टफोन असेल, जो 12GB RAM (6GB फिजिकल रॅम + 6GB व्हर्च्युअल रॅम) आणि Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह येईल.