ग्लोबली लाँच झाला Huawei ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोन; तब्बल इतक्या किंमतीत मिळणार 10.2-इंच मोठ्या स्क्रीनची मजा
चिनी कंपनी Huawei चा जगातील पहिला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन अखेर ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन केवळ त्यांच्या होम मार्केटमध्ये लाँच केला होता, मात्र आता ग्लोबली देखील लाँच झाला आहे. कंपनीने मंगळवारी निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये Huawei Mate XT Ultimate Design हा जगातील पहिला ट्रिपल फोल्ड स्मार्टफोन लाँच केला आहे.
हा ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोन कंपनीचा अशा प्रकारचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सप्टेंबर 2024 मध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता तो ग्लोबली देखील उपलब्ध झाला आहे. हा हँडसेट पूर्णपणे उघडल्यावर 10.2-इंचाची मोठा स्क्रीन समोर येते. यात 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे, ज्यामध्ये 12-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो शूटरचा समावेश आहे. या फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8 रेटिंग असल्याचा दावा केला जात आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
UAE मध्ये Huawei Mate XT Ultimate Design चा 16GB + 1TB रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन मॉडेल AED 12,999 म्हणजेच अंदाजे 3,07,800 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन सध्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. हँडसेटची डिलिव्हरी 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोन काळ्या आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Huawei Mate XT Ultimate Design मध्ये 10.2-इंच (3,184×2,232 पिक्सेल) फ्लेक्सिबल LTPO OLED डिस्प्ले आहे. एकदा फोल्ड केल्यावर या स्मार्टफोनची स्क्रीन 6.4-इंच स्क्रीन (1,008×2,232 पिक्सेल) आणि दोनदा फोल्ड केल्यावर या स्मार्टफोनची स्क्रीन 6.4-इंच स्क्रीन (1,008×2,232 पिक्सेल) होती. स्क्रीन 90 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ पर्यंत टच सॅम्पलिंग रेट, 1440 हर्ट्झपर्यंत पीडब्ल्यूएम डिमिंग रेट आणि 382 पीपीआय पिक्सेल डेन्सिटीला सपोर्ट करते.
ग्लोबली लाँच करण्यात आलेल्या Huawei Mate XT Ultimate Design मध्ये कोणता प्रोसेसर देण्यात आला आहे, याबाबत अद्याप कंपनीने माहिती नाही. मात्र अशी लीक समोर आले आहे की, स्मार्टफोन चीनी व्हेरियंट इन-हाउस Kirin 9010 SoC प्रोसेसरवर चालतो. हा फोन जागतिक स्तरावर 16 जीबी रॅम आणि 1 टीबी ऑनबोर्ड स्टोरेजसह उपलब्ध आहे. हे EMUI 14.2 आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालते.
फोटोग्राफीसाठी, Huawei Mate XT Ultimate Design मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) आणि f/1.2 आणि f/4.0 दरम्यान व्हेरिएबल अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर आणि मागील बाजूस 5.5x ऑप्टिकल झूम, 50x डिजिटल झूम, OIS आणि f/3.4 अपर्चरसह 12-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंट कॅमेऱ्यात f/2.2 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.
Huawei Mate XT Ultimate Design मध्ये 5600 mAh बॅटरी असून ती 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि एक USB 3.1 टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. या हँडसेटला पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8 रेटिंग असल्याचा दावा केला जातो आणि सुरक्षेसाठी बाजूला माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पूर्णपणे उघडल्यावर, त्याचे वजन 298 ग्राम आणि साइज 156.7x219x3.6mm होते.