Upcoming Smartphones: लवकरच होणार मोठा धमाका! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स, वाचा यादी
ऑक्टोबर महिन्यात टेक ब्रँड्स मोठा धमाका करणार आहेत. OnePlus पासून Realme आणि iQOO सह अनेक ब्रँड्स ऑक्टोबर महिन्यात त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. यामध्ये बजेट डिव्हाईसपासून प्रिमियम स्मार्टफोनपर्यंत अनेकांचा समावेश असणार आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडं थांबा, धीर धरा.
वनप्लसचा फ्लॅगशिप फोन 15 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटचा भाग बनणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा मोठा LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे आणि Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देखील या फोनमध्ये असणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरी आणि 16GB पर्यंत रॅम असू शकते. (फोटो सौजन्य – X)
चीनी मार्केटमध्ये 15 ऑक्टोबर रोजी iQOO 15 लाँच केला जाणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज असणार आहे. या डिव्हाईसमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे आणि यामध्ये 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 7000mAh क्षमता वाली बॅटरी देखील असणार आहे.
धाकड गेमिंग एक्सपीरियंस देण्यासाठी Realme GT 8 Pro लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये 200MP पेरीस्कोप टेलीफोटो लेंस आणि दोन 50MP सेंसर्सवाला कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 सेंसर आणि 7000mAh बॅटरी ऑफर केली जाऊ शकते.
ओप्पो स्मार्टफोन 16 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन डिसेंबर महिन्यात भारतात लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये Dimensity 9500 प्रोसेसर आणि 7500mAh वाली मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनमध्ये 200MP कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
चीनी मार्केटमध्ये वीवोची हे नवीन लाइनअप MediaTek Dimensity 9500 प्रोसेसरसह लाँच केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोन्सच्या नवीन लाइनअप, X300 आणि X300 Pro मध्ये BOE Q10+ LTPO OLED डिस्प्ले, 200MP पर्यंत कॅमेरा सेटअप, IP68/69 रेटिंग आणि मोठ्या बॅटरी असतील.
Redmi Note 15 Pro 5G या नवीन स्मार्टफोनमध्ये 20MP सेल्फी कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 200MP Samsung ISOCELL सेंसरवाला प्राइमरी कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. या फोनसह, कंपनीचे लक्ष परवडणाऱ्या किमतीत शक्तिशाली हार्डवेअर आणि कॅमेरावर असेल.
200MP कॅमेरासह हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात लाँच केला जाणार आहे. यात स्टायलिश डिझाइन आणि खास एआय फीचर्स आहेत. या डिव्हाइसमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आहे. अधिक चांगल्या कामगिरीसाठी, ते मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.