Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स
टेक कंपनी वनप्लस 7 एप्रिल रोजी भारतात मोठा धमाका करणार आहे. कंपनी 7 एप्रिल रोजी OnePlus Nord 6, Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite हे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच करणार आहे. Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite या दोन्ही फोनचे डिझाईन आणि लूक OnePlus Nord 6 प्रमाणेच असणार आहे. वनप्लस नॉर्ड CE 6 मध्ये कंपनी 7000mAh बॅटरी देणार आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या OnePlus Nord CE 5 चे अपग्रेड असणार आहे. OnePlus Nord CE 6 च्या मागील बाजूला 50MP चा मुख्य प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनचे फीचर्स ऑनलाईन लीक झाले आहेत. OnePlus Nord CE 6 मध्ये 6.7 इंच LED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट, 7000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर असू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन देखील भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनचे डिझाईन आयफोन 17 प्रमाणेच आहे. तसेच या बजेट स्मार्टफोनमध्ये कंपनी 9020mAh बॅटरी देणार आहे. हा आगामी विवो स्मार्टफोन iQOO Z11 चा रीब्रँडेड मॉडेल असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन भारतात 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे असण्याची शक्यता आहे. यामध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यासाठी सोनी IMX882 सेन्सर वापरला जाण्याची शक्यता आहे. एक सेकंडरी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, एक 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.
Oppo Find X9 सीरीजचा हा स्मार्टफोन देखील एप्रिल महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. 20 एप्रिल रोजी हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. Oppo Find X9 Ultra चा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. हा फोन 16GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनी 6.85 इंचाचा दमदार ओएलईडी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 प्रोसेसर देऊ शकते. हा स्मार्टफोन 200MP कॅमेरासह लाँच केला जाणार आहे. हा पहिला फोन असेल ज्यामध्ये 10x ऑप्टिकल झूम दिला जाणार आहे.
2 एप्रिल रोजी Vivo V70 FE भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप, 200 एमपी प्राइमरी शूटर, मीडियाटेक 7360 प्रोसेसर असणार आहे. Vivo V70 FE मध्ये 6.83-इंच 1.5K फ्लॅट AMOLED डिस्प्ले असू शकतो. नॉर्दन लाइट्स पर्पल आणि मानसून ब्लू या रंगांमध्ये स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
Ai+ Nova 2 Ultra 5G भारतात 9 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. यामध्ये मागील बाजूला एक अनोखे इंटरॅक्टिव गोलाकार RGB LED लाइट स्ट्रिप दिली जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T8200 चिपसेट, 6.8 इंच 120Hz IPS डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन एनएक्सटीक्वांटम ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.






