मोबाईल मार्केटमध्ये होणार धमाका! पुढील आठवड्यात लाँच होणार हे 4 स्मार्टफोन्स, वाचा किंमत आणि फिचर्स
येत्या आठवड्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. यामध्ये ओप्पो, वीवो, पोको आणि सॅमसंग या कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. या सर्व स्मार्टफोन्समध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच केले जाणार आहेत. या आगामी स्मार्टफोन्सच्या लाँचिंगपूर्वीच त्यांचे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत.
यादीमधील सर्वात पहिलं डिव्हाईस आहे OPPO K13x 5G. हा स्मार्टफोन 23 जून रोजी लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G रेडी प्रोसेसर दिला जाणार आहे. यासोबतच फोनमध्ये 6.72 इंचाचा FHD+ एलसीडी डिस्प्ले आणि 128 रिफ्रेश रेट असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 12 ते 14 हजार रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
24 जून रोजी या यादीमधील दुसरा स्मार्टफोन vivo T4 Lite 5G लाँच केला जाणार आहे. हा एक एंट्री लेवल स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये मीडियाटेकचा 6300 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 6000 एमएएच बॅटरी असणार आहे. यासोबतच या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असणार आहे. फोन डुअल रियर कॅमऱ्याने सुसज्ज असणार आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा असू शकतो. यासोबतच फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असू शकतो. या फोनची किंमत 10000 रुपयांहून कमी असणार आहे.
या यादीमध्ये तिसरा स्मार्टफोन POCO F7 आहे. हा फोन 24 जून रोजी लाँच केला जाणार आहे. हा एक मिड रेंज डिव्हाईस असणार आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर असू शकतो. यासोबतच, या सेगमेंटमध्ये 7550 mAh ची सर्वात मोठी बॅटरी दिली जाण्याची शक्यात आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले असू शकतो. याशिवाय, फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी विजनला सपोर्ट करणार आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
Tech Tips: कोणत्याही अलर्टशिवाय आता होणार कॉल रिकॉर्डिंग, हे आहे स्मार्टफोनमधील सीक्रेट फीचर
हा स्मार्टफोन 27 जून रोजी लाँच केला जाणार आहे. या मिड-रेंज डिव्हाइसमध्ये तुम्हाला गोरिल्ला ग्लास व्हिक्टर प्लसचे संरक्षण मिळू शकते. यासोबतच, हे डिव्हाइस Exynos 1380 प्रोसेसरने सुसज्ज असू शकते. या फोनमध्ये AI-enhanced 50MP ट्रिपल कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळू शकतो. फोनची किंमत 18,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.