
Free Fire Max: बॅटलग्राऊंड गेममध्ये या 3 चूका करणं तुम्हाला पडेल महागात, तुमचं अकाऊंट होऊ शकतं गायब!
जेव्हा प्लेअर्स सहसा फ्री फायर खेळायला सुरुवात करतात, तेव्हा ते गेस्ट अकाउंट तयार करतात. मात्र हे अकाऊंट कायमचं नसतं. जेव्हा तुम्ही गेम अनइंस्टॉल करता तेव्हा तुमचं हे अकाऊंट देखील डिलीट केले जातं. या कारणास्तव, जर तुम्ही गेस्ट अकाउंट वापरत असाल तर ते कधीही गायब होईल. ते तुमच्या गुगल, फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटसोबत त्वरित लिंक करा. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक प्लेअर्स मनोरंजनासाठी किंवा नकळत त्यांच्या टीममेट्सना नॉक करतात. जर तुम्ही असं वारंवार केलं तर तुमच्या अकाऊंट विरोधात तक्रार केली जाऊ शकते. याशिवाय डिमेरिट पॉइंट देखील कमी केले जाऊ शकतात. जर हे खूप वेळा घडले तर तुमचे अकाउंट फ्री फायर मॅक्स डेव्हलपर्सकडून कायमचे निलंबित केले जाऊ शकते. तुम्ही ही चूक करू नये, अन्यथा तुमचे सर्व परिश्रम वाया जातील. तुमचं अकाऊंट कायमचं बॅन केलं जाईल.
फ्री फायम मॅक्समध्ये अनेक प्लेअर्स चांगलं खेळण्याचा प्रयत्न करतात मात्र ते यशस्वी होत नाहीत. अशावेळी हे प्लेअर्स हॅक्स आणि मोड्सचा वापर करण्याचा निर्णय घेतात. तुम्ही अशा प्रकारची चूक करू नये, अन्यथा तुमचे खाते कायमचे बंद केले जाईल. अनेकांना हे माहित नसेल की गॅरेनाने हॅकर्सविरुद्ध कठोर कारवाई केली आहे आणि त्यांचा वापर करून गेम खेळल्याने तुमचे खाते त्वरित बंद होऊ शकते.