
लॅपटॉपवर कव्हर लावणं योग्य की टेम्पर्ड ग्लास? एक चुकीचा निर्णय आणि तुम्हीही कराल पश्चाताप! जाणून घ्या फायदे आणि नुकसान
लॅपटॉपचे हार्ड कव्हर किंवा बॅक केस स्क्रीन प्रोटेक्शनसाठी एक उत्तम पर्याय आहे, असं अनेक लोकांना वाटतं. याचा फायदा म्हणजे हे किरकोळ धक्क्यांपासून डिव्हाइसचे संरक्षण करते आणि लॅपटॉपवर ओरखडे येण्यापासून संरक्षण करते. मात्र याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जर तुम्ही सतत तुमच्या लॅपटॉपला कव्हर घालून ठेवले तर तुमचा लॅपटॉप गरम होतो आणि स्क्रीनवर दबाव येऊ शकतो. ज्यामुळे काळानुसार लॅपटॉपचा डिस्प्ले डॅमेज होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. काही कव्हर असे देखील असतात ज्यांचा लॅपटॉपवर भार येतो आणि यामुळे बिजागरांवर ताण येतो. त्यामुळे जर तुम्ही कव्हरचा वापर करत असाल तर यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॉडी नक्कीच सुरक्षित राहिल पण स्क्रीन 100 टक्के सुरक्षित राहणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनप्रमाणेच तुम्ही लॅपटॉपसाठी देखील टेम्पर्ड ग्लासचा वापर करू शकता. याचे फायदे देखील आहेत. हलक्या धक्क्यांपासून किंवा ओरखड्यांपासून तुमच्या लॅपटॉप स्क्रीनचे रक्षण केले जाते. मॅट फिनिश टेम्पर्डमुळे रिफ्लेक्शन कमी होते आणि तुमच्या डोळ्यांना आराम मिळतो. टेम्पर्ड ग्लास वापरण्याचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे नुकसान देखील आहे. जसे की, सर्व लॅपटॉप स्क्रीन टेम्पर्ड ग्लाससोबत कम्पॅटिबल नसते. टेम्पर्ड ग्लासमुळे टचस्क्रीन लॅपटॉपमध्ये संवेदनशीलता कमी होण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीने टेम्पर्ड ग्लास लावल्यास एयर बबल आणि स्क्रीन प्रेशरमुळे स्क्रीन क्रॅक होऊ शकते. लॅपटॉप मजबूत गोरिला ग्लास किंवा OGS डिस्प्ले तंत्रज्ञानावर बनला असेल तर टेम्पर्ड ग्लासचा वापर करणं व्यर्थ आहे.
Ans: प्रोसेसर, RAM, स्टोरेज, बॅटरी आणि वापराचा उद्देश पाहावा.
Ans: Intel Core i5/i7 किंवा AMD Ryzen 5/7 चांगले मानले जातात.
Ans: दैनंदिन वापरासाठी 8GB, हेवी कामासाठी 16GB योग्य.