Google चा गेम-चेंजर अपडेट! अकाऊंट अॅक्सेस न गमावता बदलू शकता ई-मेल अॅड्रेस, यूजर्सना असा होणार फायदा
आतापर्यंत गुगल युजर्सना अशावेळी ई-मेल अॅड्रेस बदलण्याची परवानगी द्यायचा, जेव्हा ते एखाद्या थर्ड पार्टी इमेलचा वापर करत असतील. जर युजरचा ई-मेल अॅड्रेस @gmail.com वरच संपत असेल तर त्यांच्याकडे जुना अॅड्रेस डिलीट करून नवीन जीमेल अॅड्रेस बदलण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मात्र आता ही सर्व्हिस बदलणार आहे. असं सांगितलं जात आहे की, गुगल हळूहळू नवीन अपडेट रोल आऊट करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने युजर्सना आगामी बदलाबाबत सांगण्यासाठी त्यांचे सपोर्ट पेज देखील अपडेट केले आहे. यामध्ये सांगितलं आहे की, युजर्स एक नवीन Gmail अॅड्रेस निवडू शकणार आहे. हे अपडेट सर्व यूजरसाठी टप्प्याटप्प्याने रोल आउट केलं जात आहे. युजर्स गुगल अकाऊंट सेटिंग्समध्ये जाऊन नवीन अपडेटचा वापर करू शकणार आहेत. सपोर्ट पेजवर सांगण्यात आलं आहे की, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटचा ईमेल ॲड्रेस जो gmail.com वर संपतो, तो बदलून एक नवीन ईमेल ॲड्रेस तयार करू शकता जो gmail.com संपेल.
जर एखाद्या यूजरने नवीन Gmail ॲड्रेस निवडला तर त्याचा सध्या उपलब्ध असलेला Gmail ॲड्रेस एक उपनाव म्हणून उपलब्ध असणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, सर्व संपर्क, ड्राइव्ह फाईल्स, ईमेल, फोटो, परचेज आणि सब्सक्रिप्शन यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जुना ईमेल ॲड्रेस सुरू राहणार आहे आणि त्यावर पाठवलेले ईमेल इनबॉक्समध्ये येणार आहेत. युजर्स नव्या किंवा जुन्या ईमेल ॲड्रेसचा वापर साइन इन करुन करू शकणार आहेत.
जीमेल, ड्राइव्ह, यूट्यूब आणि मॅप्स सारख्या सर्विसेजसाठी उपलब्ध साइन-इन ॲक्सेसवर कोणताही परिणाम होणार नाही. सपोर्ट पेजमध्ये बरीच महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे. त्यामुळे Gmail ॲड्रेस बदलण्याची ही प्रक्रिया कशी काम करणार आहे, याबाबत युजर्स सविस्तरपणे जाणून घेऊ शकतात. सर्वात आधी युजर्स प्रत्येक 12 महिन्यात एकदा त्यांचा जीमेल ॲड्रेस बदलू शकणार आहे. हा ॲड्रेस एकूण 3 वेळा बदलला जाऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की, युजर्सना अकाऊंसाठी एकूण 4 जीमेल ॲड्रेस मिळणार आहेत. तुमचा जुना ईमेल ॲड्रेस देखील अकाउंटला जोडला जाणार आहे.
Ans: Google Sign Up पेजवर जाऊन अकाऊंट तयार करता येतं.
Ans: हो, काही परिस्थितीत Google ही सुविधा देतो.
Ans: ताबडतोब पासवर्ड बदला आणि Account Recovery वापरा.






