BSNL Recharge Plan: नव्या वर्षानिमित्त टेलिकॉम कंपनीची खास ऑफर! या प्लॅन्समध्ये यूजर्सना फ्री मिळणार 100GB डेटा, असा घ्या फायदा
BSNL India ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर BiTV प्लानमध्ये मिळणाऱ्या ऑफरबाबत माहिती दिली आहे. ही ऑफर 24 डिसेंबरपासून सुरू झाली असून 31 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना फ्री चॅनलसह डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. BSNL BiTV प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर या प्लॅनची किंमत 251 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 400 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेलचा अॅक्सेस दिला जाणार आहे. यामध्ये अनेक प्रीमियम टीव्ही चॅनेलचा समावेश आहे. यासोबतच यामध्ये 23 हून अधिक ओटीटी अॅप्सचा अॅक्सेस दिला जाणार आहे. ज्यामध्ये जियो हॉटस्टार, सोनी लिव इत्यादींचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Christmas ends.
BSNL Christmas Carnival Plan continues! Enjoy 100GB high-speed data, unlimited calls, free BiTV entertainment and 30 days validity – all at just ₹251. Recharge smart via #BReX 👉 https://t.co/41wNbHpifE#BSNL #ChristmasCarnival #BSNLOffers #BSNLOffer #FreeBiTV… pic.twitter.com/jCzakRTNH7 — BSNL India (@BSNLCorporate) December 26, 2025
BSNL ने नवीन वर्षाच्या निमित्ताने काही खास प्रीपेड प्लॅनसह फ्री डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे. युजर्सना कंपनीच्या निवडक 2GB आणि 2.5GB डेली डेटा वाल्या प्लॅनमध्ये अनुक्रमे 2.5GB आणि 3GB डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या STV 225, STV 347, STV 485 आणि PV 2399 वाल्या प्लॅनमध्ये ही ऑफर दिली आहे. 225 रुपयांचा प्लॅन 30 दिवसांच्या व्हॉलिडिटीसह ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये युजर्सना आता रोज 2.5GB ऐवजी 3GB डेटा मिळणार आहे. यामध्ये युजर्सना पूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगसह डेली 100 फ्री SMS चा लाभ मिळणार आहे.
BSNL च्या 347, 485 आणि 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना आता 2GB डेली डेटाऐवजी 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि डेली 100 फ्री एसएमएस देखील ऑफर केले जाणार आहे. 347 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 50 दिवस, 485 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 72 दिवस आणि 2399 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवस आहे.
Ans: मोबाईल, लँडलाईन, ब्रॉडबँड, FTTH आणि एंटरप्राइज सेवा.
Ans: BSNL 4G सेवा टप्प्याटप्प्याने सुरू असून 5G ची तयारी सुरू आहे.
Ans: होय, BSNL चे प्लॅन किफायतशीर मानले जातात.






