Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

वोडाफोन-आयडिया (Vi) ने एक नवीन आणि अनोखा प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा लिमिट सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. अशी सुविधा ऑफर करणारी वोडाफोन-आयडिया ही पहिली कंपनी आहे. कंपनीच्या या प्रयत्नांना यूजर्सचा कसा प्रतिसाद मिळणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 11:46 AM
Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Vi Recharge Plan: काय सांगता! आता यूजर्सच्या हिशोबाने सेट होणार इंटरनेट डेटा लिमिट; कंपनीने लाँच केले दोन नवे प्लॅन्स

Follow Us
Follow Us:
  • Vi ने 249 आणि 250 रुपयांचे दोन नवे रिचार्ज प्लॅन लॉन्च केले असून, दोन्ही प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
  • 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळणार असून, यूजर्सना डेटा लिमिट स्वतः सेट करता येणार आहे.
  • 250 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, नॅशनल रोमिंग आणि 28 दिवसांसाठी स्पॉटिफाय प्रिमियम मिळणार आहे.
देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या वोडाफोन-आइडियाने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन विशेष आहे कारण या प्लॅनमध्ये यूजर्सना त्यांच्या मर्जीने डेटा लिमिट सेट करण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या अशी सुविधा इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी ऑफर करत नाही. वोडाफोन-आइडियाच्या या नवीन कल्पनेला यूजर्सचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

कंपनीने लाँच केले दोन नवीन रिचार्ज प्लॅन

कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी 249 आणि 250 रुपये असे दोन प्लॅन्स लाँच केले आहेत. हे प्लॅन्स विशेषत: अशा लोकांसाठी सुरु करण्यात आले आहेत, ज्यांना कमी खर्चात त्यांचे सिम सुरु ठेवायचे आहे. खरं तर सध्या टेलिकॉम कंपन्या एका डेटा लिमिटसह रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. ही डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सना पुन्हा इंटरनेटचा वापर करण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पाहावी लागते किंवा एखादा ॲड ऑन पॅक खरेदी करावा लागतो. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन आता वोडाफोन-आयडियाने एक नवीन प्रयत्न केला आहे. यूजर्स नंबर रिचार्ज केल्यानंतर डेली डेटा एकत्र वापरू शकतात ज्यामुळे त्यांना कोणत्याही डेटा लिमिटची भिती असणार नाही. किंवा यूजर्स त्यांच्या मर्जीनुसार डेटा लिमिट सेट करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

वोडाफोन-आयडिया त्यांच्या नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 0.5GB या हिशोबाने एकूण 14GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनची विशेषत: म्हणजेच, यूजर्स त्यांच्या हिशोबाने प्लॅनची डेटा लिमिट सेट करू शकणार आहेत. तसेच, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाणार आहे. यासोबतच रोज 100 मोफत एसएमएसचा लाभ देखील मिळणार आहे. हा प्लॅन विशेषत: अशा यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे, ज्यांना कमी खर्चात त्यांचा नंबर सुरु ठेवायचा आहे.

पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स… लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स

250 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

हा प्लॅन देखील यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग आणि अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा लाभ मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना 2GB डेटा देखील ऑफर करत आहे. यासोबतच, 28 दिवसांसाठी स्पॉटिफाय प्रिमियम देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स त्यांच्या मर्जीने डेटा लिमिट सेट करू शकणार नाहीत.

Web Title: Vi launched two new recharge plans users will get option to set data limit tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • recharge plans
  • Tech News
  • vodafone idea

संबंधित बातम्या

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या
1

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!
2

Lava Smart 4 : दणकट बाहुबलीच…पडल्यावरही फुटणार नाही! अवघ्या ₹8499 मध्ये Lava चा Smart 4 स्मार्टफोन; घरपोच मोफत सर्व्हिस!

Airtel Business आणि ITI Limited एकत्र; देशातील डिजिटल व्यवसायांना मिळणार नवी ताकद
3

Airtel Business आणि ITI Limited एकत्र; देशातील डिजिटल व्यवसायांना मिळणार नवी ताकद

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी
4

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.