पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्स... लवकरच येणार नवा Motorola स्मार्टफोन, लाँचपूर्वीच समोर आले डिटेल्स
बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे
काही रिपोर्ट मध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचे अनेक फिचर्स गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला Moto G57 Power सारखे असू शकतात. नवीन Moto G Max स्मार्टफोन प्रीमियम डिझाईन, दमदार बॅटरी, पावरफुल प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेट वाल्याडिस्प्ले सह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी देखील स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स लाँचिंगपूर्वीच लीक झाले आहेत. (फोटो सौजन्य -motorola)
कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झाले तर, या डिव्हाईसमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये कोर्निंग गोरिला ग्लास 7i चे प्रोटेक्शन मिळू शकते. ग्राहक हा स्मार्टफोन पॅन्टोन स्टारगेझर, पॅन्टोन मालागा आणि पॅन्टोन अलास्कन ब्लू सारख्या प्रीमियम कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.
स्मार्टफोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 6s जेन 4 प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच यामध्ये 6GB/8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB युएफएस 3.1 स्टोरेजचा पर्याय मिळणार आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला होणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये MIL-STD-810H मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी उत्तम रेजिस्टेंस देखील मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी या आगामी स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी एलवायटी-600 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, जो डे-लाइट आणि लो-लाइट फोटोग्राफीसाठी ऑप्टिमाइज केला असेल. या आगामी डिव्हाईसमध्ये 7000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यावर बॅटरी 3 दिवसांचा बॅकअप देऊ शकते.
आगामी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 16 मिळणार आहे आणि कंपनीने या डिव्हाईससाठी 2 वर्षांचे अँड्रॉईड ओएस अपडेट आणि 3 वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्स ऑफर करण्याचे वचन दिले आहे. स्मार्टकनेक्ट फीचरद्वारे यूजर्स हा स्मार्टफोन पीसी आणि टॅब्लेटसोबत अगदी सहज कनेक्ट करू शकतो.






