Vivo Smartphone: Vivo चा तगडा स्मार्टफोन लवकरच भारतात करणार एंट्री, बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार दमदार स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत भारतात एंट्री करणार आहे. टी-सिरीजचा हा नवीन स्मार्टफोन Vivo T4x 5G या नावाने भारतात लाँच केला जाऊ शकतो. भारतात या फोनच्या लाँचिंग टाइमलाइनचा खुलासा झाला आहे. विवोचा हा आगामी स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनची जागा घेईल. कंपनीने एप्रिल 2024 मध्ये Vivo T3x 5G लाँच केला होता. आता कंपनी या सिरीजमधील त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीचा हा आगामी Vivo T4x 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मवर दिसला होता. त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतात एंट्री करणार असल्याचं सांगितलं जात आहे. बीआयएस लिस्टिंगसह, हा विवो फोन आयएमईआय डेटाबेसमध्ये देखील आढळला आहे. तथापि, या दोन्ही लिस्टिंगमध्ये या आगामी स्मार्टफोनच्या हार्डवेअर आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल फारशी माहिती समोर आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
MySmartPrice ने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की Vivo T4x 5G स्मार्टफोन मार्च 2025 मध्ये भारतात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने या फोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. तसेच कंपनीने या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल देखील माहिती शेअर केली नाही. मात्र हा आगामी स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतील लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, विवोच्या या आगामी फोनमध्ये 6,500mAh बॅटरी आहे, जी या सेगमेंटमधील स्मार्टफोनमध्ये आतापर्यंतची सर्वात पावरफुल आहे. यापूर्वी कंपनीने Vivo T3x 5G स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली होती. अहवालात आगामी फोनच्या रंग पर्यायांची माहिती देखील देण्यात आली आहे. हा विवो फोन प्रोंटो पर्पल आणि मरीन ब्लू रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाईल.
विवोच्या आगामी फोनमध्ये सूचनांसाठी डायनॅमिक लाईट (सूचना एलईडी) दिली जाईल. सूचना मिळाल्यावर हा प्रकाश चमकेल. यापूर्वी कंपनीने Vivo Y58 5G स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक लाईट फीचर दिले होते. हा फ्लॅश फोनच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये देण्यात आला होता. Vivo T4x 5G स्मार्टफोन 15 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. याआधी कंपनीने याच किमतीत Vivo T3x 5G स्मार्टफोन देखील लाँच केला होता.
सध्या Vivo T4x 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल फारशी माहिती नाही. हा फोन गेल्या वर्षी कंपनीने लाँच केलेल्या Vivo T3x 5G स्मार्टफोनची जागा घेईल. अशा परिस्थितीत, कंपनी हा स्मार्टफोन अनेक अपग्रेडसह रिलीज करेल. Vivo T3x 5G च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, ते Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. या फोनमध्ये 128 जीबी स्टोरेजसह 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी रॅम पर्याय आहेत. या फोनमध्ये 6.72 इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये 6,000 एमएएच बॅटरी आणि 44 वॅट वायर्ड चार्जिंग आहे.