Vivo चे दोन 5G फोन आता नवीन रॅम व्हेरिअंटमध्ये दाखल! 9020mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने सुसज्ज... वाचा सविस्तर
विवो टी5 लाइट 5G च्या नव्या व्हेरिअंटमध्ये 4GB रॅम+ 64GB स्टोरेज मिळणार आहे. याची किंमत फ्लिपकार्टवर 30,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ‘कमिंग सून’ टॅगसह दिसत आहे. हा स्मार्टफोन जुलै महिन्यात 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: Vivo)
विवो टी5 प्रो 5G चे नवीन व्हेरिअंट आता 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 49,999 रुपयांत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन देखील ‘कमिंग सून’ टॅगसह दिसत आहे. एप्रिल महिन्यात हा स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला होता. दोन्ही विवो फोन्सच्या नवीन आवृत्त्या फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ सेलदरम्यान खरेदीसाठी उपलब्ध असतील; हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये विवो टी5 लाइट 5G मध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट मिळणार आहे. यासोबतच, यामध्ये डुअल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP65 रेटिंग मिळणार आहे.
विवो टी5 प्रो 5G मध्ये 6.83-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 चिपसेट मिळणार आहे. या फोनमध्ये देखील डुअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा बोकेह कॅमेरा मिळणार आहे.
स्मार्टफोनच्या समोरील बाजूला फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 9,020mAh बॅटरी मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी डिव्हाईसमध्ये IP68 + IP69 रेटिंग मिळणार आहे.






