4G नंतर आता Vivo V50 Lite च्या 5G व्हेरिअंटची एंट्री, कमाल फीचर्स मिळणार आता तुमच्या बजेटमध्ये
स्मार्टफोन कंपनी Vivo च्या Vivo V50 Lite स्मार्टफोनचा 4G व्हेरिअंट अलीकडेच तुर्कीमध्ये लाँच करण्यात आला आहे. या 4G व्हेरिअंटनंतर आता कंपनीने या स्मार्टफोनचा 5G व्हेरिअंट लाँच केला आहे. Vivo V50 Lite 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. या Vivo स्मार्टफोनचे अनेक फीचर्स Vivo V50 Lite च्या 4G व्हेरिअंटसारखेच आहेत, जो कंपनीने काही दिवसांपूर्वी काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच केला होता. मात्र आता नव्या स्मार्टफोनच्या काही फिचर्समध्ये बदल करण्यात आला आहे.
Vivo V50 Lite स्मार्टफोनचे 4G आणि 5G व्हेरिअंट भारतात कधी लाँच केले जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मात्र हे व्हेरिअंट भारतात लवकरच लाँच केले जातील अशी आशा आहे. फेब्रुवारीमध्ये भारतात Vivo V50 स्मार्टफोन लाँच झाला. यानंतर आता ही नवीन स्मार्टफोन देखील लवकरच भारतात एंट्री करतील, अशी अपेक्षा आहे. Vivo V50 Lite चा 5G व्हेरिअंट MediaTek Dimensity 6300 चिपसेट, 6500mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. (फोटो सौजन्य – X Vivo)
Vivo V50 Lite 5G स्मार्टफोन 399 युरो म्हणजेच सुमारे 37,200 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम + 512GB स्टोरेज पर्यायासह सादर करण्यात आला आहे. हा फोन सध्या स्पेनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन पर्पल, ब्लॅक, सिल्क ग्रीन आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनचे सर्व रंग आकर्षक आहेत, स्मार्टफोनची डिझाइन देखील अद्वितीय आहे.
Vivo V50 Lite 5G स्मार्टफोन 6.77-इंचाच्या फुल-एचडी+ (1,080×2392 पिक्सेल) 2.5D पॉलेड डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, ब्राइटनेस 1,800 निट्स आहे, जो SGS लो ब्लू लाईट सर्टिफिकेशनला सपोर्ट करतो. हा फोन Android 15 वर आधारित FuntouchOS 15 सह लाँच करण्यात आला आहे.
हा Vivo फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह येतो, जो 12GB LPDDR4X रॅम आणि 512GB UFS 2.2 स्टोरेज ऑफर करतो. विवोने या फोनचा 4G व्हेरिअंट स्नॅपड्रॅगन 685 चिपसह लाँच केला आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Vivo V50 Lite 5G मध्ये 50-मेगापिक्सेल IMX882 प्रायमरी सेन्सर आहे. यासोबतच फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तर 4G व्हेरिअंटमध्ये सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा होता. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी, या फोनमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo V50 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6500mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोनमध्ये ड्युअल नॅनो SIM, 5G, 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, ओटीजी, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटी आहे. हा फोन IP65 रेटिंग आणि MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड ड्रॉप-रेझिस्टन्स सर्टिफिकेशनसह बाजारात लाँच करण्यात आला आहे.