
किंमत कमी अन् फीचर्स भारी! Oppo चे स्वस्त व्हेरिअंट पाहून सर्वांनाच बसला धक्का, पावरफुल प्रोसेसरने आहे सुसज्ज
गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी
Oppo K14x 5G स्मार्टफोन आता 4GB + 64GB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. या नव्या व्हेरिअंटची किंमत 12,999 रुपये आहे. यापूर्वी कंपनीने हा स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 6GB + 128GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आहे. बँक ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी ठरावीक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिटवर 750 रुपयांचे इंस्टेंट डिस्काऊंट ऑफर करत आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर तीन महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील उपलब्ध आहेत. हा फोन ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा आयसी ब्लू आणि प्रिझम व्हायलेट रंगांमध्ये येतो. (फोटो सौजन्य – X)
The new OPPO K14x 5G is now available in 4+64GB at ₹12,999. Sale is live on Flipkart. ⚡ Buy Now: https://t.co/07nuDKKFVs #OPPOK14x5G #OPPOKSeries #MorePowerLessLag pic.twitter.com/lmEZB4S84V — OPPO India (@OPPOIndia) March 10, 2026
Oppo K14x 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.75-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची कमाल ब्राइटनेस 1125 निट्स आहे. हा ओप्पो फोन IP64 रेटिंगसह येतो.Oppo K14x 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट,एआरएम माली-जी 57 एमसी 2 जीपीयू, 6GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128GB चे UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे.
Oppo K14x 5G स्मार्टफोनमध्ये डुअल सिम, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाईप-C पोर्ट, 3.5mm ऑडियो जॅक, बेईडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस कनेक्टिविटी पर्याय देण्यात आले आहेत. Oppo K14x 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे. ज्यासोबत 2-मेगापिक्सेलचा डेप्थ लेंस देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. Oppo च्या या फोनमध्ये 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.