बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी Vivo सज्ज! 30 हजारांहून कमी किंमतीत लाँच केला नवा स्मार्टफोन, कॅमेरा क्वालिटी पाहून उडतील होश
चिनी स्मार्टफोन कंपनी Vivo ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo V50e या नावाने भारतात लाँच करण्यात आला आहे. पावरफुल बॅटरीसह या स्मार्टफोनमध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची कॅमेरा क्वालिटी कमाल आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासह डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे.
विवोने फेब्रुवारी महिन्यात Vivo V50 स्मार्टफोन लाँच केला होता. आता या स्मार्टफोन सिरीजमधील नवीन व्हेरिअंट लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स पाहून नक्कीच अनेकांचे होश उडणार आहेत. चला तर मग आता स्मार्टफोनच्या किंमती, स्टोरेज व्हेरिअंट आँणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
हा स्मार्टफोन 8 GB RAM+128 GB आणि 8 GB + 256 GB या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 28,999 रुपये आणि 8 GB + 256 GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री 17 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon, Flipkart आणि देशातील Vivo च्या ई-स्टोरमधून खरेदी करू शकता. स्मार्टफोनची प्री बुकींग सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन पर्ल व्हाइट आणि सॅफायर ब्लू कलर्स रंगांच्या पर्यांयामध्ये उपलब्ध आहे.
Check out the new vivo V50e. Luxury never looked better and now you can own it with exclusive offers.
Prebook Now https://t.co/iiBfuyz1EB#vivoV50e #PortraitSoPro pic.twitter.com/cPFlx37DLA
— vivo India (@Vivo_India) April 10, 2025
V50e स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच फुल HD+ (1,080 x 2,392 पिक्सेल) क्वाड-कर्व्ड डिस्प्ले, 120 Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300 Hz चा टच सँपलिंग रेट आणि 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस लेवल आहे. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेसाठी डायमंड शील्ड ग्लास प्रोटेक्शन आहे.
या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसरसाठी 4 nm ऑक्टाकोर MediaTek Dimensity 7300 चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर बेस्ड FuntouchOS 15 वर आधारित आहे. स्मार्टफोनला तीन वर्षांसाठी OS अपग्रेड आणि चार वर्षांसाठी सिक्योरिटी अपग्रेड दिले जाणार आहे.
स्मार्टफोनच्या ड्युअल रिअर कॅमेरा युनिटमध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्राथमिक कॅमेरा आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) आणि f/1.79 अपर्चरला सपोर्ट करतो. याशिवाय, 116 अंश फील्ड-ऑफ-व्ह्यूसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात फ्रंटला 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
या स्मार्टफोनची 5,600mAh बॅटरी 90 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट
V50e वरील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G, 5G, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि USB Type-C पोर्टचा समावेश आहे. या स्मार्टफोनचे वजन अंदाजे 186 ग्रॅम आहे. या महिन्यात Vivo चा X200 Ultra देखील लाँच केला जाईल. यासोबत X200s देखील लाँच केले जाईल. X200 Ultra मध्ये 6.82-इंचाचा क्वाड-कर्व्ह BOE LTPO डिस्प्ले असू शकतो.