भारतापूर्वी या देशात सुरु होणार Elon Musk ची स्टारलिंक सेवा, आता सिमशिवाय वापरता येणार इंटरनेट
भारतात एलन मस्कची स्टारलिंक सेवा कधी सुरु होणार, याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. स्टारलिंकच्या सेवेसाठी भारतीय प्रचंड उत्सुक आहेत. कारण भारतातील ज्या भागात इंटरनेटचा अभाव अशा लोकांना स्टारलिंकमुळे इंटरनेटचा वापर करता येणार आहे. मात्र भारतात स्टारलिंकचा मार्ग अद्याप स्पष्ट नाही. कारण सरकारने अद्याप स्टारलिंकसाठी मान्यता दिलेली नाही. भारतातील स्टारलिंकच्या सेवेबाबत चर्चा सुरु असतानाच आता एक असा देश आहे ज्याने स्टारलिंकच्या सेवेला मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
WhatsApp घेऊन येतोय नवीन फीचर्स, आता युजर्सची सिक्योरिटी होणार अधिक पावरफुल! जाणून घ्या सविस्तर
भारतापूर्वी आता एलन मस्कची स्टारलिंक सेवा बांगलादेशात सुरु होण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंकला बांगलादेशात कामकाज सुरू करण्याचा परवाना देण्यात आला आहे. याबाबत सोमवारी घोषणा करण्यात आली आहे. वृत्तानुसार, बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरणाचे चौधरी आशिक महमूद यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यामुळे आता भारतापूर्वी बांगलादेशातील लोकांनी एलन मस्कची स्टारलिंक सेवा वापरता येणार आहे. ही सेवा बांगलादेशात कधी सुरु केली जाणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
बांगलादेश गुंतवणूक विकास प्राधिकरणाचे चौधरी आशिक महमूद यांनी सांगितलं होतं की, ‘स्टारलिंकला देशात काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कंपनी आता येथे आपली सेवा सुरू करू शकते.’ त्यामुळे भारतीयांप्रमाणेच बांगलादेशातील लोकं सुद्धा स्टारलिंक इंटरनेट सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतात स्टारलिंकच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होत असतानाच बांगलादेशात मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून स्टारलिंक भारतातही सेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जिओ आणि एअरटेल दोघांनीही स्टारलिंकशी हातमिळवणी केली होती. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे ही सेवा सुरू करणार आहेत. त्यामुळे आता बांगलादेशानंतर भारतात देखील स्टारलिंकची सेवा सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
ढाका अंतरिम प्राधिकरणाकडून राजनैतिक मदत घेतली जात आहे. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, हे बांगलादेशचे एक राजनैतिक पाऊल देखील असू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. कारण स्टारलिंकचे मालक एलन मस्क यांना व्हाईट हाऊसमध्ये मोठा पाठिंबा आहे. मस्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत अनेक प्लॅटफॉर्म शेअर करतात. अलिकडेच अमेरिकेने बांगलादेशी वस्तूंवर 37% पर्यंत कर लादला आहे. तर यापूर्वी कापसावर फक्त 16% दर आकारला जात होता. त्यामुळे एलन मस्कची स्टारलिंक सेवा सुरु केल्यामुळे बांगलादेशातील सरकारला एक प्रकारे फायदा होऊ शकतो, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसाठी शुल्क वाढवले आहे. यामध्ये भारताचे नावही समाविष्ट आहे. स्टारलिंक लवकरच उपखंडात प्रवेश करणार आहे. आयात शुल्क कमी करण्यासाठी वेगवेगळे देश रणनीती आखत आहेत. बांगलादेशचे हे पाऊल याचाच एक भाग मानले जात होते. या प्रकरणात, बांगलादेश सरकार मस्ककडे मदत मागू शकते. आग्नेय आशियामध्ये स्टारलिंककडून व्यवसायाचा विस्तार केला जात आहे. तो भारत आणि बांगलादेशच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.