Vivo V60e: DSLR लाही हरवणारा 200MP कॅमेरा आणि दमदार बॅटरीने सुसज्ज... नव्या स्मार्टफोनचे फीचर्स ऐकून थक्क व्हाल!
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी Vivo ने भारतीय बाजारात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन त्यांच्या V60 सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. कंपनीने हे नवीन डिव्हाईस Vivo V60e या नावाने लाँच केलं आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर केला आहे. एवढंच नाही तर कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये खास AI इमेजिंग वाला 200MP चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Vivo V60e कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 3 व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 256GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज या टॉप व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हे नवीन डिव्हाईस एलीट पर्पल आणि नोबल गोल्ड कलरमध्ये सादर केलं आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोरद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – X)
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 6.77-इंचाचा क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,600 निट्सची पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. हे डिव्हाईस Android 15-बेस्ड FuntouchOS 15 वर आधारित आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक 7360-टर्बो चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आली आहे.
vivo V60e Launched in India – 6.78-inch Quad Curved 120Hz AMOLED
– 1600 nits peak brightness
– Diamond Shield Glass
– MediaTek Dimensity 7360-Turbo
– Up to 12GB RAM
– Up to 256GB storage
– 6500mAh/90W
– 200MP Main, 8MP UW, 50MP selfie
– IP68 + IP69
– FuntouchOS 15
– Colours:… pic.twitter.com/xEYgAmm31E — Mukul Sharma (@stufflistings) October 7, 2025
फोटोग्राफी लवर्ससाठी हा स्मार्टफोन अतिशय खास असणार आहे. कया स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्टसह येतो. यासोबतच या डिव्हाईसमध्ये 30x झूम आणि 85mm पोर्ट्रेट इमेजिंग सपोर्ट देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरासह फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड-अँगल लेंस आहे.
App बनवण्यासाठी कोडिंग नाही, फक्त कल्पना हवी! AI च्या मदतीने करा धमाका आणि कमवा लाखो रुपये!
फोनमध्ये समोरील बाजूस AI ऑरा लाइट पोर्ट्रेट सपोर्टवाला 50-मेगापिक्सेलचा आई ऑटो-फोकस सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हे भारतातील पहिले डिव्हाइस आहे ज्यामध्ये AI फेस्टिव्हल पोर्ट्रेट, AI फोर सीझन्स पोर्ट्रेट आणि इमेज एक्सपांडर आहेत. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी आहे.