
सज्ज व्हा! तगड्या फीचर्ससह नवा Vivo V80 एंट्रीसाठी तयार, लाँचिंगपूर्वीच समोर आले डिटेल्स
आगामी स्मार्टफोनची घोषणा कंपनीच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे. लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यासंबंधित एआय फीचर्सबाबत देखील माहिती समोर आली आहे. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा स्मार्टफोन फोटोग्राफी आणि व्हिडीओसाठी फोकस्ड डिव्हाईस ठरू शकते. (फोटो सौजन्य: Vivo)
रिपोर्ट्सनुसार, विवो व्ही 80 डिव्हाईस 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये सादर केले जाऊ शकते, ज्याची बॉक्स एमआरपी 1,19,999 रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र फोनची किंमत यापेक्षा अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन भारतात 60 हजार रुपयांहून अधिक किंमतीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
अद्याप कंपनीने अधिकृतपणे या स्मार्टफोनच्या किंमतीची घोषणा केली नाही. नवा स्मार्टफोन 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाणाार आहे. हा स्मार्टफोन सनराईज अँथम, होरायझन ब्लू आणि स्टेलर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांत उपलब्ध असणार आहे. लाँचिंगनंतर हा स्मार्टफोन विवो वेबसाईटव्यतिरिक्त ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
फोनमध्ये 6.59 इंच 1.5K ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्क्रीनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आमि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाऊ शकते. यासोबतच, या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित ओरिजिनओएस 7 मिळू शकते. फोनमध्ये वन-पीस कोल्ड-कार्व्ड ग्लास डिझाईन आणि फ्लोटिंग कॅमेरा मॉड्यूल दिले जाऊ शकते. परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट मिळू शकते. यासोबत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज मिळू शकते.
विवो व्ही 80 स्मार्टफोनमध्ये 50MP ओआईएस प्रायमरी कॅमेरा, 50MP नाइट टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP ग्रुप सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. फोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम सपोर्ट आणि 100x पर्यंत झूम सपोर्ट देखील मिळू शकतो. या डिव्हाईसमध्ये 4K सिनेमेटिक व्हिडीओ, 4K 60fps व्हिडीओ, एआय क्रिएटिव कॅमेरा, लाइव स्टिकर कोलाज आणि एआय दिवाळी पोर्ट्रेट 2.0 सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही… अशी आहे ऑफर
याशिवाय, आगामी विवो स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 आणि IP69 रेटिंग मिळू शकते. आगामी डिव्हाईसमध्ये 90W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7200mAh बॅटरी दिली जाऊ शकते.