Zeiss कॅमेरा आणि 6500mAh बॅटरी...भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवीन स्मार्टफोन
टेक कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo X200 FE लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा ऑफिशियल टीजर जारी करण्यात आला आहे. हा फोन नुकताच तैवानमध्ये लाँच करण्यात आला. यानंतर आता लवकरच हा स्मार्टफोन भारतात देखील लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे इंडियन स्पेसिफिकेशन्स देखील कंपनीने कंफर्म केले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनची भारतातील एंट्री कंफर्म झाली आहे.
विवोच्या आगामी हँडसेटमध्ये Zeiss-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल सेंसर असेल. Vivo X200 FE मध्ये MediaTek Dimensity 9300+ चिपसेट दिला जाणार आहे आणि हा स्मार्टफोन IP68+IP69 रेटिंग्ससह लाँच केला जाणार आहे. यामध्ये 6500mAh बॅटरी दिली जाणार आहे. X वरील एका पोस्टमध्ये, चिनी उत्पादकाने घोषणा केली की, Vivo X200 FE लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. टिझरमध्ये स्मार्टफोनच्या लाँच डेटचा खुलासा करण्यात आला नाही. Vivo ने आगामी लाँचसाठी कंपनीच्या वेबसाइटवर एक समर्पित मायक्रोसाइट तयार केली आहे. या यादीमध्ये डिव्हाइसचे नवीनतम स्पेसिफिकेशन उघड झाले आहेत. (फोटो सौजन्य – Vivo)
भारतात Vivo X200 FE Android 15-बेस्ड Funtouch OS 15 आणि 6.31-इंच डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे. यामध्ये
MediaTek Dimensity 9300+ चिपसेट असणार आहे. हँडसेटमध्ये Zeiss-ब्रँडेड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट दिला जाणार आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सल मुख्य कॅमेरा (Sony IMX921, f/1.88, OIS), 50-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा (IMX882, 3x ऑप्टिकल झूम) आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा (f/2.2) यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे.
Vivo X200 FE मध्ये IP68+IP69 रेटिंग्स दिली जाणार आहे, जी डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस सुनिश्चित करते. म्हणजेच, डिव्हाईस 1.5 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटे टिकू शकेल. यात 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh सिलिकॉन कार्बन बॅटरी असेल. Vivo च्या चाचण्यांनुसार, डिव्हाईस एका चार्जवर 25.44 तासांचा YouTube प्लेबॅक वेळ देते. पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त 57 मिनिटे लागतात.
जागतिक बाजारपेठेसाठी Vivo X200 FE हा Vivo S30 Pro Mini चा रिब्रँडेड व्हर्जन असल्याचे मानले जाते. गेल्या महिन्यात चीनमध्ये Vivo S30 Pro चे 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंट CNY 3,499 म्हणजेच सुमारे 41,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. भारतात त्याची किंमत सुमारे 50,000 रुपये असू शकते.