आता स्मार्टवॉचमध्येही मिळणार टॅप अँड पे फीचर! boAt घेऊन आलाय अनोख्या फीचर्ससह नवं गॅझेट, किंमत केवळ 2,599 रुपये
टेक कंपनी boAt च्या नव्या स्मार्टवॉचने बाजारात धुमाकूळ घातला आहे. कारण या नव्या डिव्हाईसमध्ये काही अनोखे फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे इतर टेक कंपन्यांची झोप उडाली आहे. boAt Wave Fortune स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच एक अनोखं फीचर ऑफर करते, हे फीचर म्हणजेच टॅप अँड पे. boAt Wave Fortune स्मार्टवॉच युजर्सना 5,000 रुपयांपर्यंत कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्याची सुविधा देते. स्मार्टवॉचच्या मदतीने पेमेंट करणं युजर्सना फार फायद्याचं ठरू शकतं.
boAt Wave Fortune स्मार्टवॉच Bluetooth कॉलिंगला सपोर्ट करते आणि यामध्ये 1.96-इंच रेक्टेंगुलर डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्ट वियरेबलमध्ये कस्टमाइजेबल वॉच फेस स्टूडियो आणि अनेक प्रीसेट वर्कआउट मोड्स देखील देण्यात आले आहेत. हे डिव्हाईस हार्ट रेट मॉनिटर सारख्या हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकर्सने सुसज्ज आहे. boAt Wave Fortune सिंगल चार्जवर सात दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ ऑफर करते. (फोटो सौजन्य – boat)
कंपनीने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे की, boAt Wave Fortune भारतात 3,299 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ऑफरअंतर्गत हे वॉच केवळ 2,599 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. सध्या boAt Wave Fortune अधिकृत वेबसाइटद्वारे देशात अॅक्टिव्ह ब्लॅक रंगाच्या पर्यायात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
boAt ने अधिकृतपणे अशी माहिती दिली आहे की, कंपनीने लेटेस्ट Wave Fortune स्मार्टवॉचवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टम सुरु करण्यासाठी Axis Bank सोबत पार्टनरशिप केली आहे. यूजर्स त्यांच्या Axis Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्सला boAt Crest Pay अॅपमध्ये अॅड करू शकतात आणि boAt Pay द्वारे पेमेंट्स करू शकतात. यासाठी Tappy च्या टोकनाइजेशन टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. यूजर्स वॉचला NFC-इनेबल्ड कार्ड मशीनवर टॅप करून 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतात आणि यासाठी कोणत्याही पिनची देखील आवश्यकता नाही.
boAt Wave Fortune मध्ये 1.96-इंच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 240×282 पिक्सेल रेजोल्यूशन, 550 नीट्स ब्राइटनेस लेवल आणि वेक जेस्चर सपोर्ट आहे.
स्मार्टवॉच अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्सने सुसज्ज आहे, ज्यामध्ये सेडेंटरी अलर्ट, डेली एक्टिविटी ट्रॅकर आणि 700 हून अधिक प्रीसेट एक्टिव मोड्स देण्यात आले आहेत. यामध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल (SpO2), स्लीप आणि स्ट्रेस मॉनिटर्स देखील आहेत. वॉच मेंस्ट्रुअल साइकिल्सला ट्रॅक करण्यासाठी मदत करतात. बोट वेव फॉर्च्यूनमध्ये कस्टमाइजेबल वॉच फेस स्टूडियो आहे. हे ब्लूटूथ कॉलिंग आणि ब्लूटूथ 5.3 कनेक्टिविटीला सपोर्ट करते. वॉचमध्ये IP68 रेटेड डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे.
या डिव्हाईसमध्ये 300mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि ती दोन तासांत पूर्णपणे चार्ज होते असा दावा केला जातो. हे स्मार्टवॉच एका चार्जवर पाच ते सात दिवस टिकते असाही दावा केला जात आहे.