
DSLR सारखा दमदार कॅमेरा अन् पावरफुल परफॉर्मंस... Vivo ने लाँच केले तगडे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स, जाणून घ्या किंमत
विवो एक्स500 स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 79,000 रुपये, 12GB + 512 GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये आणि 12GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे. विवो एक्स 500 प्रो च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 93,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,499 म्हणजेच सुमारे 1,07,000 रुपये आणि 12GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,22,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य: Vivo)
या सिरीजच्या टॉप ऑफ द लाइन मॉडल विवो एक्स 500 प्रो मॅक्स च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,14,000 रुपये ठेवली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 8,499 म्हणजेच सुमारे 1,22,000 रुपये आहे. 12GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,29,000 रुपये आहे.
चीनमध्ये विवो एक्स500 प्रो मॅक्स आणि विवो एक्स500 या स्मार्टफोन्सची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होईल. विवो एक्स500 प्रो ची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू होईल. विवो एक्स500 डॉन, एकोझ ऑफ द अर्थ, नाइट फोटोग्रफी आणि सनी या रंगांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. एक्स500 प्रो सीरीज सनसेट आणि डॉन शेडमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
विवो एक्स500 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच 1.5K (1,260 x 2,750 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 144Hz, HDR सपोर्ट, टच सँपलिंग रेट 300Hz आहे. हा फोन IP68 + IP69 रेटिंगसह येतो. हा स्मार्टफोन 3nm ओक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये G1 अल्ट्रा जीपीयू, V3+ ब्लूप्रिंट इमेजिंग चिप, 12GB की एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 ऑबोर्ड स्टोरेज मिळणार आहे.
विवो एक्स500 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.68) प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64-मेगापिक्सेल (f/2.55) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 3.1x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. विवो एक्स500 स्मार्टफोनमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,500mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5G, 4G एलटीई, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट, वायफाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी देण्यात आली आहे.
एक्स500 प्रो मध्ये 6.36-इंच 1.5K (1,216 x 2,660 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. एक्स500 प्रो मॅक्समध्ये 6.85-इंच 2K (1,440 x 3,168 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आणि पिक्सेल डेन्सिटी 507 पीपीआय पिक्सेल आहे. एक्स500 प्रो सिरीज फ्लॅगशिप ग्रेड मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो चिपसेटसह लाँच करण्यात आली आहे, जी 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आली आहे. याची पीक क्लॉक स्पीड 4.55GHz आहे. या फोनमध्ये माली-जी2-अल्ट्रा-एनएक्स जीपीयू, V3+ आणि VS1 ब्लूप्रिंट इमेज चिप्स, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम, आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, ज्यासोबत 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. विवो एक्स500 प्रोमध्ये 64-मेगापिक्सेल (f/2.52) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. तर प्रो मॅक्समध्ये 200-मेगापिक्सेल (f/2.67) टेलीफोटो सेंसर दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. एक्स500 प्रो मध्ये 6,510mAh बॅटरी आणि विवो एक्स500 प्रो मॅक्समध्ये 8,000mAh बॅटरी दिली आहे.