सिद्धू मूसे वाला पुन्हा दिसणार स्टेजवर! होलोग्राम टेक्नॉलॉजी दाखवणार मॅजिक, दर्शकांना दिसणार 3D अवतार
गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान क्षेत्राने मोठा टप्पा पार केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक नवीन शोध लावण्यात आले आहेत. ज्यामुळे लोकांची जीवनसरणी पूर्णपणे बदलली आहे. स्मार्टफोनपासून अगदी घरात वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीनपर्यंत सर्व वस्तूंमध्ये प्रचंड बदल झाला आहे. अशीच एक बदलत्या तंत्रज्ञानाची झलक या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या टेक शो CES 2025 मध्ये पाहायला मिळाली होती.
आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
CES 2025 या शोदरम्यान अनेक मोठ्या कंपन्यांनी अनोखे तंत्रज्ञानाची झलक दाखवली. या शोमध्ये एक खास होलोग्राम बॉक्स देखील पाहायला मिळाला. या बॉक्समध्ये अशी खास टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे लोकांना असं वाटतं की खरंच एखादा व्यक्ती या बॉक्सच्या आतमध्ये आहे. होलोग्राम बॉक्स येत्या काही काळात जागत धुमाकूळ घालणार आहे. या बॉक्समुळे अशा अनेक व्यक्ती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत, ज्या लोकांच्या स्मरणात आहेत.
या टेक्नॉलॉजीच्या मदतीने लवकरच सर्वांच्या आठवणीत असणारे सिद्धू मुसे वाला देखील आपल्याला पुन्हा एकदा स्टेजवर पाहायला मिळणार आहेत. स्टेजवर लाईट, लोकांची गर्दी आणि लोकांच्या मनाला भिडणारे बिट्स… या सर्वांदरम्यान होलोग्राम टेक्नॉलॉजीच्या मदतीने सिद्धू मुसेवाला स्टेजवर पाहायला मिळणार आहेत. हे सर्व तंत्रज्ञान पाहून असे वाटेल की सिद्धू मुसे वाला खरंच पुन्हा एकदा त्यांच्या गाण्याची जादू दाखवायला आले आहेत आणि हे सर्व खास होलोग्राम टेक्नॉलॉजीच्या मदतीने शक्य होणार आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने दिवंगत पंजाबी सिंगर वर्चुअली पाहायला मिळणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
लवकरच साईन टू वार 2026 वर्ल्ड टू अंतर्गत सिद्धू मुसे वाला यांचा थ्रीडी अवतार संपूर्ण जगाला भावूक करणार आहे. यापूर्वी या टेक्नॉलॉजीच्या मदतीने मायकल जॅक्सन, टुपैक, व्हिटनी ह्युस्टन यांसारखे मोठे कलाकार वर्चुअली पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा सिद्धू मुसे वाला यांची प्रतिमा, त्यांचे शब्द आणि त्यांचा अनोखा स्वॅग भारतीयांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार आहे. आता लवकरच भारतीयांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे.
होलोग्राम तंत्रज्ञान हे एक थ्रीडी प्रोजेक्शन तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रकाश आणि लेझर वापरून हवेत तरंगणारी प्रतिमा तयार केली जाते. ही प्रतिमा एखाद्या जिवंत व्यक्ती सारखी वाटते. जर तुम्ही समोरून पाहिले तर असे वाटेल की खरंच एखादी व्यक्ती तुमच्यासमोर उभी आहे. या तंत्रज्ञानात मोशन कॅप्चर आणि रियल टाईम रेंडरिंग सारखे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
सिद्धू मूसे वाला कोण आहे?
पंजाबी सिंगर
सिद्धू मूसे वालाचा मृत्यू कधी झाला?
29 मे 2022