स्मार्टफोन खरेदी करताना तुम्हीही IP रेटिंग तपासता? यातील अंकाचा खरा अर्थ माहिती आहे का? जाणून घ्या
पावसात भिजल्यानंतर किंवा पाण्यात पडल्यानंतर देखील आपला स्मार्टफोन योग्य प्रकारे काम करतो. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. यामागे कोणती जादू आहे का? पाण्यात पडल्यानंतर फोन योग्य प्रकारे कसा काम करतो, याबद्दल अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं. पण यामागे कोणतीही जादू नसून ही टेक्नोलॉजीची कमाल आहे. ही टेक्नोलॉजी डिव्हाईसला पाणी आणि धूळीपासून सुरक्षित ठेवते. यापूर्वी फोन पाण्यात पडल्यानंतर खराब व्हायचे. मात्र आता अनेक स्मार्टफोन Water-Resistant असतात.
Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत
अपडेटेड टेक्नोलॉजीसह लाँच केले जाणारे अनेक स्मार्टफोन्स वॉटर-रेसिस्टेंट टॅगसह येतात. वॉटर-रेसिस्टेंट म्हणजे फोन वॉटरप्रुफ आहे किंवा त्याला अगदी 4 ते 5 तासांसाठी पाण्यात डुबवू शकता, असं नाही. वॉटर-रेसिस्टेंट याचा अर्थ तुमचा फोन अगदी थोड्या वेळासाठी पाण्यात पडला तर त्याला काही होत नाही. यासाठी वेळ आणि पाणी किती खोलं असावं याची मर्यादा निश्चित केली जाते. कोणताही फोन 100% वॉटरप्रूफ नसतो. ‘वॉटरप्रूफ’ म्हणजे तो काही प्रमाणात पाण्याला प्रतिरोधक असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रत्येक वॉटर-रेसिस्टेंट फोन एक IP (Ingress Protection) रेटिंगसह लाँच केला जातो, ज्यामध्ये IP67 किंवा IP68 यांचा समावेश असतो. IP लिहील्या जाणारा अंकांचा अर्थ नक्की आहे, याबाबत अनेकांना माहिती नसतं. चला तर मग जाणून घेऊया.
पहिला अंक (जसं की ‘6’): हे घन कणांपासून (जसे की धूळ) सुरक्षितता दर्शवते. ‘6’ म्हणजे धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित.
दूसरा अंक (जसं की ‘7’ किंवा ‘8’): याचा अर्थ तुमचा फोन पाण्यापासून सुरक्षित आहे.
IP67: याचा अर्थ तुमचा फोन 1 मीटर खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो.
IP68: याचा अर्थ तुमचा फोन 1.5 मीटर किंवा त्यांहून खोल पाण्यात 30 मिनिटांपर्यंत सुरक्षित राहू शकतो.
स्क्रीन आणि बॉडी: फोनच्या बॉडीला डिस्प्ले जोडण्यासाठी एक मजबूत, वॉटरटाइट अॅडेसिव्हचा वापर केला जातो. हा एका गॅस्केटसारखा काम करतो.
बटणे आणि पोर्टवर: व्हॉल्यूम बटणे, पॉवर बटण, सिम ट्रे आणि चार्जिंग पोर्ट सारख्या बटणांमधील प्रत्येक छिद्रावर लहान रबर गॅस्केट किंवा ओ-रिंग असतात. याचा वापर पाणी रोख्यासाठी केला जातो.
स्पीकर आणि माईकवर: स्पीकर आणि मायक्रोफोनवरील छिद्रांवर एक बारीक जाळी बसवलेली असते. ही जाळी ध्वनि आणि हवा आत जण्यासाठी मदत करते, मात्र पाण्याला आतील भागांपर्यंत जाण्यापासून रोखते.
फोनचे आतील सर्किटरी जसं की सर्किट बोर्ड्स, कनेक्टरवर अतिशय पातळ, अदृश्य नॅनो-कोटिंग चढवली जाते. ही कोटिंग पाण्याला अंतर्गत घटकांपासून दूर ठेवते.