Tech Tips: स्मार्टफोनचा कॅमेरा पावरफुल, पण फोटो मात्र बेकार; या 5 सेटिंग्ज करणार तुमची मदत
स्मार्टफोन आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. या डिव्हाईसच्या मदतीने आपण आपली अनेक कामं पूर्ण करू शकतो. स्मार्टफोन केवळ चॅटिंग आणि कॉलिंगसाठीच नाही तर फोटोग्राफीसाठी देखील फायद्याचा ठरतो. हल्ली स्मार्टफोनमध्ये हाय मेगापिक्सेलवाले कॅमेरा लेन्स दिल्या जातात. यामध्ये AI सपोर्ट देखील दिला जातो. यामुळे फोटोग्राफी अधिक चांगली होते. मात्र काही घटनांमध्ये फोनचा कॅमेरा पावरफुल असतो मात्र तरी देखील फोटो चांगले येत नाहीत.
फोटो चांगले आले नाही तर लोकं स्मार्टफोन बदलण्याचा देखील विचार करतात. पण फोटो चांगले येत नसतील तर स्मार्टफोन बदलण्याची नाही तर सेटिंग बदलण्याची आवश्यकता आहे. खूप पैसे देऊन आपण महागडा स्मार्टफोन खरेदी करतो, मात्र फोटो चांगले आले नाहीत तर आपण फोनला दोष देतो. पण सेटिंगमध्ये काही बदल करून फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तुमची फोटोग्राफी पाहून सर्वच म्हणतील वाह वाह… (फोटो सौजन्य – Pinterest)
हल्ली लोकं फोटोग्राफी करताना HDR मोड ऑटोमध्ये ठेवतात. फोटो खराब होण्यामागे हेच कारण आहे. अनेकवेळा HDR मोडमुळे फोटोमधील कलर अधिक ब्राईट होतात आणि बॅकग्राऊंड खराब होतं. यामुळे फोटोग्राफी करताना HDR मोड बंद ठेवा किंवा गरज असेल तेव्हा मॅन्युअली ऑन करा.
जेव्हापासून AI फिचर्स स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात जोडले आहेत, तेव्हापासून फोटो अधिक चांगले येत आहेत. पण यातील काही फिचर्स असे आहेत ज्यामुळे चेहरा पूर्णपणे बदलतो. जर तुम्ही फोनमध्ये AI ब्यूटी मोडचा वापर करत असाल तर तुमचा चेहरा अधिक स्मूद किंवा आर्टिफिशियल दिसू शकतो. पण जर तुम्हाला नैसर्गिक फोटो पाहिजे असतील तर हा मोड बंद करावा लागणार आहे. यामुळे तुमचे फोटो जास्त चांगले येऊ शकतात.
फोटो क्लिक करताना जर तुम्ही फोनला ऑटो फोकस मोडवर ठेवत असाल, तर अशा परिस्थितीत हे फीचर अनेकदा योग्य ऑब्जेक्टवर फोकस करतात, तर काही वेळा हे फीचर चुकीच्या ऑब्जेक्ट वर फोकस करतात. ज्यामुळे या स्मार्टफोनमध्ये फोकस मोड नियंत्रित करण्यासाठी सेटिंग देण्यात आलेली असते. जर तुम्हाला तुमचा फोटो अधिक चांगला आणि शार्प पाहिजे असेल तर फोकस नेहमी मॅन्युअली कंट्रोल करा.
WhatsApp ने केला धमाका! आता Chatting करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, सर्व ग्रूपसाठी येणार नवं Feature
अनेक स्मार्टफोन ऑटो एक्सपोजरचा वापर करतात. यामुळे फोटो अधिक ब्राईट आणि डार्क होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले फोटो पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर स्लाइड करून स्वतः ब्राईटनेस ऍडजस्ट करू शकता. कमी प्रकाशात देखील तुम्ही एक्सपोजर वाढवून ब्राइट फोटो क्लिक करु शकतात.
तुमच्या फोटोचा फॉरमॅट देखील फोटो खराब करू शकतो. जर तुम्ही JPEG फॉर्मेटमध्ये फोटो क्लिक करत असाल तर यामुळे देखील फोटोची क्वालिटी खराब होऊ शकते. अशावेळी तुम्ही हाय-एफिशिएंसी इमेज फॉर्मेटचा वापर करु शकता.