Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच रिकामं होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा

बनावट आयव्हीआर कॉलद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कोणत्याही कॉलवर तुमची संवेदनशील माहिती शेअर करू नका. अशाच एका स्कॅममधून बंगळुरुमध्ये एका महिलेने 2 लाख रुपये गमावले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 09, 2025 | 10:04 AM
काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच खाली होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा

काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच खाली होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवूणक करण्यासाठी शेकडो मार्ग शोधले आहेत. जोपर्यंत लोकांना एका स्कॅमच्या पद्धतीबाबत सावध केल जात असतं, तोपर्यंत स्कॅमर्स लोकांची फसवूणक करण्यासाठी दुसरी पद्धत अ‍ॅक्टिव्हेट करतात. डिजीटल स्कॅम, डिजीटल अरेस्ट, सायबर फ्रॉड, व्हिडीओ कॉल, ओटीपी स्कॅम, एटीएम स्कॅम अशा अनेक पद्धतींनी आतापर्यंत लोकांची फसवूणक केली जात होती. मात्र आता स्कॅमर्सनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट आयव्हीआर कॉल ही पद्धत सुरु केली आहे.

RBI ने उचललं मोठं पाऊल, बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! युजर्सना होणार फायदा

स्कॅमर्सनी बनावट इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (IVR) स्कॅमद्वारे लोकांना फसवण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, IVR ही एक स्वयंचलित फोन प्रणाली आहे. हे टेलिकॉम कंपन्या आणि बँका इत्यादींद्वारे वापरले जाते. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्समध्ये युजर्सना “भाषा निवडण्यासाठी 1 दाबा” किंवा “बँक बॅलन्स माहितीसाठी 2 दाबा” इत्यादी कमांड किंवा कीपॅड इनपुटवर सेवा प्रदान केल्या जातात. मात्र आता याच पद्धतीचा वापर करून सामान्य लोकांची फसवूणक केली जात आहे. अशाच एका स्कॅममधून बंगळुरुमध्ये एका महिलेने 2 लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे लोकांनी अशा कॉल्सपासून सावध राहणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

बंगळुरूमध्ये एक महिला फसवणुकीची बळी ठरली

अलिकडेच बेंगळुरूमध्ये एका महिला स्कॅमर्सच्या बनावट आयव्हीआर घोटाळ्यात अडकली आणि या घटनेत तिचे तब्बल 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. खरंतर, त्या महिलेला तिच्या बँकेच्या आयव्हीआरसारखा कॉल आला. या कॉलमध्ये तिला सांगण्यात आले की तिच्या खात्यातून 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जात आहेत. हा व्यवहार थांबवण्यासाठी, महिलेला एक बटण दाबण्यास सांगण्यात आले. तिने बटण दाबताच तिच्या खात्यातून 2 लाख रुपये स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झाले. महिलेने याबद्दल बँक आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे.

बनावट आयव्हीआर कॉल कसा ओळखायचा?

बनावट आयव्हीआर कॉल ओळखणे खूप सोपे आहे. खरं तर, खऱ्या आयव्हीआर दरम्यान, तुम्हाला कधीही ओटीपी आणि पासवर्ड सारखी संवेदनशील माहिती विचारली जाणार नाही. जर कोणी तुम्हाला अशी संवेदनशील माहिती विचारत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. याशिवाय, स्कॅमर तुमच्यावर घाई करण्यासाठी दबाव आणतील, परंतु हे प्रत्यक्ष कॉलमध्ये केले जात नाही. तसेच, बनावट आयव्हीआर कॉलद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. कॉल दरम्यान तुम्हाला काही संशयास्पद हालचाली जाणवल्यास, कॉल ताबडतोब डिस्कनेक्ट करा.

तुमच्या फायद्याची बातमी! डेली 3GB डेटासह मिळणार Netflix आणि Amazon Prime, या कंपन्या देतायत जबरदस्त ऑफर्स

आयव्हीआर घोटाळा कसा टाळायचा?

  • अशा कोणत्याही कॉलवर तुमची संवेदनशील माहिती शेअर करू नका.
  • व्यवहारांची पडताळणी करण्यासाठी एसएमएस आणि ईमेल सूचना सक्षम करा.
  • स्पॅम कॉल थांबवण्यासाठी, डू नॉट डिस्टर्ब (DND) सेवा सक्रिय करा.
  • कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्याचे आढळल्यास, ताबडतोब पोलीस आणि इतर तपास संस्थांशी संपर्क साधा

Web Title: What is ivr call scam just at one click your account will empty know some safety tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…
1

iPhone, iPad आणि Mac युजर्सवर हॅकर्सची नजर! कंपनीने दिलाय इशारा, तुमचे डिव्हाईस आत्ताच करा अपडेट अन्यथा…

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स
2

म्युझिक लव्हर्ससाठी खुशखबर! Spotify चे नवीन प्रीमियम प्लॅन्स भारतात लाँच, Platinum मध्ये AI DJ सह मिळणार हे अनोखे फीचर्स

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..
3

DPDP 2025: केंद्र सरकारने जारी केले नवे नियम! यूजर्सना त्यांच्या डेटावर मिळणार कंट्रोल, भारताचा पहिला डिजिटल प्रायव्हसी कायदा..

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा
4

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.