RBI ने उचललं मोठं पाऊल, बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय! युजर्सना होणार फायदा
स्कॅम, ऑनलाईन फसवणूक यासोबतच आता बँकांच्या नावाखाली होणाऱ्या फसवूणकीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. याच सर्व वाढत्या घटना रोखण्यासाठी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकांच्या नावाखाली होणारे डिजिटल फ्रॉड थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांसाठी एक विशेष ‘.bank.in’ इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता बँकांच्या नावाखाली होणारे स्कॅम थांबवण्यासाठी मदत होणार आहे. यामुळे, लोकांना बँकेच्या खऱ्या आणि बनावट वेबसाइटमध्ये फरक करणे सोपे होईल. या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आरबीआयची ही घोषणा या वर्षी एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. सर्व बँकांना एप्रिलपर्यंत या नवीन डोमेनवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, भारतीय बँकांसाठी एक विशेष .bank.in इंटरनेट डोमेन सुरू केले जाईल, ज्याचा उद्देश ऑनलाइन आर्थिक फसवणूक रोखणे आहे. हे डोमेन एप्रिल 2025 पासून लागू होईल. या महत्त्वाच्या निर्णयामुळे ग्राहकांना बँकेची खरी वेबसाइट ओळखणे सोपे होईल. डिजिटल फसवणुकीची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय आहे, याच घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मल्होत्रा म्हणाले की, सायबर सुरक्षेचे धोके कमी करण्यासाठी सर्व बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांना (एनबीएफसी) सुरक्षा सुधारण्याची आवश्यकता आहे. पेमेंट आणि बँकिंग प्रणालीची डिजिटल सुरक्षा मजबूत करण्यासाठी आरबीआय सतत पावले उचलत आहे. देशांतर्गत डिजिटल पेमेंटमध्ये अतिरिक्त प्रमाणीकरण घटक (AFA) सादर करणे हे असेच एक पाऊल आहे. देशात डिजिटल फसवणूक वाढत आहे. हे टाळण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण लागू केले आहे. ज्यामुळे ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित होईल. आता हे सुरक्षा उपाय आंतरराष्ट्रीय ऑनलाइन व्यवहारांवर देखील लागू होतील. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने ऑफशोअर व्यापाऱ्याला ऑनलाइन पेमेंट केले तर त्याला अतिरिक्त सुरक्षा प्रक्रियेतून जावे लागेल.
50 मेगापिक्सेल कॅमेरा 5500mAh बॅटरी; OnePlus चा शक्तिशाली 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
आजकाल सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंक, ईमेल किंवा संदेशावर क्लिक करू नका. याशिवाय, OTP सारखी संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.