
Free Fire MAX: कसा बनला जगभरातील गेमर्सचा आवडता बॅटलरॉयल गेम? रोमांचक इतिहास माहिती आहे का?
फ्री फायर मॅक्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे या गेमचे ग्राफिक्स इंजिन. या गेममध्ये नकाशे, शस्त्रे, स्मोक इफेक्ट, वॉटर रिफ्लेक्शन आणि कॅरेक्टर मूवमेंट्सना अतिशय रियलिस्टिक ईफेक्ट देण्यात आला आहे. विशेषत: प्रसिद्ध मॅप बर्मूडा मॅक्समध्ये डिटेलिंग आणि विजुअल्स हाय-एंड स्मार्टफोन्सवर अतिशय अप्रतिम दिसतो. ज्यामुळे प्लेअर्सना जबरदस्त बॅटर रॉयल अनुभव मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
या गेममधील आणखी एक खास गोष्ट म्हणजेच याची फायरलिंक टेक्नोलॉजी. या फीचरच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या जुन्या फ्री फायर अकाऊंटला कोणत्याही अडचणीशिवाय फ्री फायर मॅक्समध्ये वापरू शकतात. स्किन्स, कॅरेक्टर्स, डायमंड्स आणि इन-गेम प्रोग्रेस सर्वकाही नव्या गेममध्ये ट्रांसफर केलं जातं. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही फ्री फायर प्लेअर असाल तर फ्री फायर मॅक्स खेळण्यासाठी तुम्हाला नवीन अकाऊंट सुरु करण्याची गरज नाही.
फ्री फायर मॅक्समध्ये 50 प्लेअर्सची बॅटल रॉयल मॅच 10 मिनिटांत संपते. या गेममध्ये क्लॅश स्क्वॉड, लोन वुल्फ, क्राफ्टलँड सारखे वेगवेगळे मोड्स देखील देण्यात आले आहेत. हे मोड्स देखील प्लेअर्ससाठी अधिक चांगल्या विजुअल्ससह अपग्रेड करण्यात आले आहेत. प्लेअर्स त्यांच्या गेमिंग स्टाईलनुसार कॅरेक्टर आणि पेट्स कस्टमाइज करू शकतात, ज्यामुळे गेमप्ले अधिक मजबूत होतो. सुरक्षा आणि एंटी-चीट सिस्टम देखील या वर्जनमध्ये अधिक मजबूत करण्यात आली आहे. ज्यामुळे प्लेअर्स हॅकर्सच्या भितीशिवाय मॅच खेळू शकतात.
फ्री फायर मॅक्स खेळण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये 4GB किंवा त्याहून अधिक रॅम असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमचा गेम स्थूथ राहणार आहे. फ्री फायर मॅक्स अशा लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यांना जास्त रियलिस्टिक आणि हाई-क्वालिटी विजुअल्ससह फ्री फायर सारखा गेम खेळायचा आहे. हा गेम अत्यंत वेगवान, रोमांचक आणि उत्साहवर्धक बॅटल रॉयल अनुभव देतो, ज्यामुळे जगभरात त्याची लोकप्रियता वाढत आहे. गेममध्ये रोज प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स जारी केले जातात. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्स वेगवेगळे रिवॉर्ड्स जिंकू शकतात. आज जारी केलेल्या रिडीम कोड्सबाबत जाणून घेऊया.