Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा 'हा' Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर
Google Pixel 9 Pro त्याच्या प्रीमियम बिल्ड, Google च्या कस्टम Tensor चिप आणि कॅपेबल ट्रिपल-कॅमेरा सिस्टमसाठी ओळखला जातो. खरं तर हा स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनची किंमत काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना उत्तम फ्लॅगशिप स्मार्टफोन अनुभव पाहिजे आहे, असे यूजर्स या स्मार्टफोनची निवड करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Pixel 9 Pro ची किंमत भारतात 1,09,999 रुपये आहे. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 21,009 रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. ज्यामुळे आता Amazon वर Google Pixel 9 Pro 88,990 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथे ग्राहकांना बँक ऑफर्स देखील दिल्या जात आहेत, ज्याद्वारे पात्र ग्राहक आणखी बचत करू शकतात. याशिवाय तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला 47,250 रुपयांचे डिस्काऊंट देखील मिळणार आहे. पण ही किंमत पूर्णपणे तुमच्या स्मार्टफोनच्या कंडीशनवर अवलंबून असणार आहे.
Google Pixel 9 Pro या प्रिमियम रेंज स्मार्टफोनमध्ये Tensor G4 चिपसेट आणि 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याशिवाय पुढील बाजूला या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच चा LTPO डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. कंपनीच्या या प्रिमिमय स्मार्टफोनच्या स्क्रीनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी, Pixel 9 Pro मध्येन मागील बाजूला ट्रिपल-कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेंसर, 48MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 5x ऑप्टिकल झूमवाला 48MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या पुढील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 42MP चा कॅमेरा दिला आहे.
Ans: "Great Indian Festival", "Summer Sale", "Republic Day Sale", "Prime Day Sale" आणि "Year-End Sale" या प्रमुख सेल्स वर्षभरात येतात.
Ans: स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप्स, टीव्ही, फॅशन, होम अप्लायन्सेस, किचन आयटम्स आणि ब्यूटी प्रोडक्ट्सवर सर्वाधिक ऑफर्स असतात.
Ans: ब्रँड आणि मॉडेलनुसार 10% ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. काहीवेळा बँक ऑफर व एक्सचेंजसह किंमत आणखी कमी होते.






