Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Power Bank Uses: पावर बँक फक्त स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वापरतात, असं तुम्हाला देखील वाटतं का? असं नाही आहे. कारण स्मार्टफोनचे असे अनेक फायदे आहेत, ज्याबाबत 90 टक्के यूजर्सना अद्याप माहिती नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2026 | 11:58 AM
Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Follow Us
Follow Us:
  • Power Bank चे 5 भन्नाट उपयोग; फक्त मोबाइल नाही तर ही डिव्हाइसेसही चार्ज करा
  • फक्त चार्जिंगपुरताच नाही Power Bank! हे स्मार्ट उपयोग कळले तर लगेच खरेदी कराल
  • Power Bank बद्दल हे सीक्रेट माहिती आहे का? फोन चार्जिंगशिवायही अनेक कामात फायदेशीर
सध्याच्या जगात स्मार्टफोन जितका महत्त्वाचा आहे, त्याच्यासोबत इतर एक्सेसरी देखील तितक्याच महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. हेडफोन्स, स्मार्टफोन कव्हर, चार्जर या सर्व एक्सेसरीसोबत स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी पावर बँक गरजेचं आहे. जर तुम्ही ट्रॅकिंग किंवा एखाद्या अशा ठिकाणी जात असाल जिथे स्मनार्टफोन चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध नसेल, तर अशावेळी तुम्ही पावर बँकचा वापर करू शकता. असे अनेक लोकं आहेत जे पावर बँकचा वापर स्मार्टफोनसोबच स्मार्टवॉच, ईअरबड्स आणि हेडफोन चार्ज करण्यासाठी करतात. पण तुम्हाला माहिकी आहे का की, पावर बँकचे बरेच फायदे आहेत. अशा काही फायद्यांबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Instagram Down: अचानक बंद पडले सोशल मीडिया अ‍ॅप! हजारो यूजर्स त्रस्त; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

USB लाइट्स लावून लँप बनवू शकता

मार्केट आणि ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला यूएसबी लाइट्स अगदी सहज मिळतील. पावर बँकचा वापर करून तुम्ही अगदी सहज यूएसबी लाइट्सचा वापर नाईट लँप म्हणून करू शकता. घराच्या सजावटीव्यतिरिक्त, तुम्ही कॅम्पिंग इत्यादी ठिकाणी याचा वापर करू शकता. वीज नसेल किंवा तुम्ही रात्री अभ्यास करत असाल तर अशावेळी तुम्हाला नक्कीच लँपची गरज पडते. अशा परिस्थितीत यूएसबी लाइट्स लावून तयार केलेला लँप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

उष्णतेपासून सुटका

ज्याप्रमाणे तुम्ही पावर बँकचा वापर करून नाईट लँप तयार केला अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एक छोटा पंखा देखील वापरू शकता. यूएसबी लाइट्स प्रमाणेच यूएसबी पंखे देखील बाजारात उपलब्ध आहेत. हे पंखे पावर बँकमध्ये प्लग-इन करताच तुम्हाला थंड हवा मिळेल आणि उष्णतेपासून सुटका देखील मिळणार आहे. तुम्ही ऑफिसपासून स्वयंपाकघरापर्यंत सर्वत्र या प्रकारच्या पंख्याचा वापर करू शकता.

सिसिटिव्ही कॅमेरा वापरताना होईल मदत

यूएसबी लाइट्स आणि यूएसबी पंख्यांप्रमाणेच तुम्ही पावर बँकच्या मदतीने सिसिटिव्हीचा वापर देखील करू शकता. यूएसबी केबलच्या मदतीने तुम्ही सिसिटिव्ह पावर बँकला कनेक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही नवीन वीज कनेक्शन देखील घ्यावे लागणार नाही.

गॅस महाग आणि बुकिंगला 25 दिवस! बजेटमध्ये मिळणारी ही किचन उपकरणे करतील मोठी बचत, आत्ताच करा खरेदी

कंटेट क्रिएटरचं काम झालं आणखी सोपं

जर तुम्ही कंटेट क्रिएटर असाल किंवा फोटोग्राफी करत असाल तर तुम्हाला लाईट्सवर जास्त खर्च करावा लागतो. पण आता असं होणार नाही. कारण तुम्ही पावर बँकला कनेक्ट होणारी रिंग लाईट खरेदी करू शकता. याची किंमत देखील कमी असते आणि दुसरा फायदा म्हणजे याचा वापर करण्यासाठी विजेची गरज नसते. रिंग लाईट पॉवर बँकचा वापर पॉवर सोर्स म्हणून करेल आणि तुम्ही ते बाहेरील शूट किंवा फोटोग्राफीसाठी देखील वापरू शकाल.

Web Title: Tech tips power bank is not just for charging your phone 90 percent users dont know these amazing uses tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
1

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
2

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
3

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर
4

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.