Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

Bluetooth Risk: कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे ब्लूटूथमध्ये देखील वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे. कारण हॅकर्स ब्लूटूथमधील त्रुटींचा फायदा घेऊन यूजर्सचे डिव्हाईस हॅक करू शकतात आणि डिव्हाईसमधील डेटा लीक करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 11, 2026 | 01:23 PM
Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस...

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस...

Follow Us
Follow Us:
  • Bluetooth ऑन ठेवण्याची सवय धोकादायक! हॅकर्स कधीही करू शकतात मोबाईल हॅक
  • सावधान! Bluetooth ऑन असल्यास तुमचा फोन होऊ शकतो टार्गेट
  • मोबाईलमध्ये Bluetooth ऑन ठेवणे ठरू शकते महागात; तज्ज्ञांनी दिला इशारा
आजच्या काळात ब्लूटूथ एक असे तंत्रज्ञान आहे, जे डिजीटल डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी मदत करते. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, वायरलेस ईयरबड्स आणि अनेक असे डिव्हाईस आहेत, जे ब्लूटूथच्या मदतीने एकमेकांसोबत कनेक्ट केले जाऊ शकतात. याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज फाइल शेयरिंग, ऑडियो कनेक्शन आणि डिव्हाईस कंट्रोल करू शकता. ब्लूटूथचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. तुम्ही स्मार्टफोनमध्ये जर सतत ब्लूटूथ ऑन ठेवत असाल तर हॅकर्स तुमचा स्मार्टफोन अगदी सहज हॅक करू शकता. यासाठी कोणत्या – कोणत्या पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

Tech Tips: फक्त फोन चार्ज करण्यासाठी नाही! 90 टक्के यूजर्सना माहिती नाहीत Power Bank चे हे फायदे, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

ब्लूजॅकिंग

ब्लूजॅकिंग एक असा स्कॅम आहे, ज्यामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्ती ब्लूटूथ चालू असलेल्या डिव्हाईसवर मेसेज किंवा फाईल्स पाठवू शकतो. अनेकदा हा स्कॅम फक्त गंमत म्हणून केला जातो. मात्र यामुळे यूजर्सच्या प्रायव्हसीवर मोठा परिणाम होतो. याशिवाय नको असलेला कंटेट तुमच्या फोनमध्ये येतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ब्लूस्नार्फिंग

ब्लूस्नार्फिंग हा सर्वात गंभीर सायबर अटॅक मानला जातो. अटॅकर्स ब्लूटूथच्या भेद्यतेचा फायदा घेऊन तुमच्या डिव्हाईसवरील संपर्क यादी, मेसेज, फोटो आणि इतर फाईल्स गुपचूप चोरी केला जातो. अनेकदा यूजर्सना याबाबत समजत देखील नाही आणि त्यांचा डेटा चोरी होतो.

ब्लूबगिंग

ब्लूबगिंग अटॅकमध्ये हॅकर्स तुमच्या डिव्हाईसवर संपूर्ण कंट्रोल मिळवतात. यानंतर हॅकर्स तुम्हाला समजू न देता तुमच्या डिव्हाईसवरून कॉल करू शकतो किंवा मेसेज पाठवू शकतो. याशिवाय तुमच्या डिव्हाईसमध्ये उपलब्ध असलेला डेटा चोरी केला जातो. यामुळे यूजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.

डिनायल ऑफ सर्विस (DoS) अटॅक

ब्लूटूथ डिव्हाईसवर डिनायल ऑफ सर्विस (DoS) अटॅक देखील केला जाऊ शकतो. यामध्ये अटॅकर्स यूजर्सच्या फोनमध्ये मोठ्या प्रमाणात कनेक्शन रिक्वेस्ट किंवा खराब डेटा पाठवून डिव्हाईस खराब करू शकतात. यामुळे तुमचे डिव्हाईस व्यवस्थित काम करत नाही. तर अनेक घटनांमध्ये डिव्हाईस क्रॅश होते.

इव्हस्ड्रॉपिंग

तुम्हाला माहिती असेल की ब्लूटूथची रेंज मर्यादित असते. म्हणजेच एका ठरावीक अंतरावर गेल्यानंतर ब्लूटूथ आपोआप डिस्कनेक्ट होते. मात्र असे काही खास गॅझेट्स आहेत, ज्यांच्या मदतीने ही रेंज वाढवली जाऊ शकते. याच गॅझेट्सचा फायदा घेऊन हॅकर्स दुरवरून बसून ब्लूटूथ कम्युनिकेशन ऐकू शकतात. यामुळे पासवर्ड, खाजगी संभाषणे किंवा आर्थिक माहिती यासारखी संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका अधित असतो.

मॅन-इन-द-मिडल (MITM) अटॅक

या अटॅकमध्ये अटॅकर्स दोन ब्लूटूथ डिव्हाईसमध्ये होणाऱ्या डेटा ट्रांसफरमध्ये अडथळे आणतात. हॅकर्स हा डेटा वाचू शकतात आणि त्यांना वाटले तर ते या डेटामध्ये बदल देखील करू शकतात. यामुळे प्रायव्हसी आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात येते.

किंमत कमी अन् फीचर्स भारी! Oppo चे स्वस्त व्हेरिअंट पाहून सर्वांनाच बसला धक्का, पावरफुल प्रोसेसरने आहे सुसज्ज

ब्लूबोर्न

ब्लूबोर्न एक गंभीर सुरक्षा त्रुटी आहे. यामुळे जगभरातील करोडो यूजर्सवर परिणाम झाला आहे. या कमकुवतपणाचा फायदा घेऊन, हॅकर्स यूजर्सच्या कोणत्याही संवादाशिवाय डिव्हाइसमध्ये घुसखोरी करू शकतात, मालवेअर स्थापित करू शकतात आणि सिस्टमवर नियंत्रण मिळवू शकतात.

Web Title: Tech tips keeping your smartphone bluetooth always on could put your device at risk of hacking tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
1

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
2

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
3

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर
4

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.