Tech Tips: तुमचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडिओ लीक झाल्यास काय करावं? घाबरु नका, अशी करा स्वतःची मदत
सध्याच्या काळात हॅकिंग आणि स्कमिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. स्कॅमर लोकांची माहिती चोरतात आणि पैसे उळकतात. याशिवात अशा देखील अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्कॅमर लोकांचे फोन हॅक करत आणि त्यांचे पर्सनल फोटो इंटरनेटवर लीक करतात. हे फोटो इंटरनेटवरून डिलिट करण्यासाठी स्कॅमर लोकांकडून मोठी पैशांची मागणी करतात. अशा परिस्थितीत लोकं घाबरून जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही स्वतःची मदत करू शकतात. स्कॅमर विरोधात ठोस पाऊल उचलू शकता.
अशा सर्व घटनांचा विचार करून अलिकडेच मद्रास आणि दिल्ली हाय कोर्टाने एक निर्णय घेतला आहे. कोर्टाने निर्देश दिले आहेत की अशा घटना घडल्यास घाबरु नका आणि अशा परिस्थितीत ठोस पावले उचला. ज्यामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची सुरक्षा करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि यूट्यूबवर इन-बिल्ट रिपोर्ट फीचरचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही प्लॅटफॉर्मला स्पष्टपणे सांगू शकता की हा कंटेंट तुमच्या परवानगीशिवाय अपलोड करण्यात आला आहे. भारतात IT नियम 2021 आणि संशोधित नियम 2023 अनुसार, एखाद्या युजरने अशी तक्रार केल्यास सर्व प्लॅटफॉर्मना 24 तासांत तक्रार स्वीकारावी लागेल आणि जास्तीत जास्त 15 दिवसात यावर तोडगा काढावा लागेल.
जर तुम्ही अशा एखाद्या वेबसाइटवर आहात ज्याचा कंटेंट तुम्ही नियंत्रित करू शकत नाहीत, तर अशावेळी WHOIS टूलद्वारे तुम्ही वेबसाईटच्या मालकाची माहिती शोधून त्यांना इमेल करू शकता. शांत, सभ्य आणि प्रोफेशनल भाषेत त्यांना संबंधित कंटेंट हटवण्यासाठी विनंती करू शकता.
राष्ट्रीय साइबर अपराध पोर्टल: www.cybercrime.gov.in किंवा Sahyog पोर्टल: डिजिटल सुरक्षा आणि तक्रारींच्या निवारणासाठी हे दोन्ही प्लॅटफॉर्म फायद्याचे आहेत. तुम्हाला तक्रार करायची असल्यास तुम्ही https://sahyog.mha.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता.
Google De-Index Tool:support.google.com/websearch/answer/6302812 याच्या मदतीने तुम्ही Google सर्चमधील तुमचा प्रायव्हेट कंटेंट ब्लॉक करू शकता. लक्षात ठेवा की याच्या मदतीनं कंटेंट डिलिट होणार नाही, मात्र सर्चमध्ये दिसत नाही.
DMCA Takedown Notice: जर तुमचा कॉपीराइटेड कंटेंट कोणी दुसर वापरत असेल आणि त्याचा उपयोग करत असेल तर DMCA नोटिसद्वारे संबंधित कंटेंट हटवला जाऊ शकतो.
ब्लूटूथ हेडफोनमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका? टेक फ्रेंडली युजर्समध्ये निर्माण झालाय गोंधळ! काय आहे सत्य?
Take It Down (Meta द्वारे): https://takeitdown.ncmec.org ही वेबसाईट अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह फोटो रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. तुमच्या फोटो/व्हिडिओचा ‘हॅश’ तयार केला जातो, मूळ फाइल अपलोड केली जात नाही. ही वेबसाईट हॅश Meta, TikTok सारखे प्लॅटफॉर्मशी जुळणार कंटेंट शोधण्यात आणि काढून टाकण्यास मदत करते. StopNCII.org: https://stopncii.org, हे टूल विशेष Non-consensual Intimate Image (NCII) म्हणजे परवानगीशिवाय अपलोड करण्यात आलेल्या फोटोना सुरक्षा देते. जर समस्या गंभीर असेल (उदा. बदनामी, अश्लीलता, सायबरबुलिंग), तर कायदेशीर नोटीस, बंदी आणि Desist लेटर दाखल करा किंवा न्यायालयात याचिका दाखल करा.