Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने युजर्समध्ये लोकप्रिय असलेला एक रिचार्ज प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनची किंमत 249 रुपये होती. युजर्समध्ये हा प्लॅन अतिशय लोकप्रिय होता, कारण या प्लॅनमध्ये कमी पैशांत जास्तीचे फायदे मिळत होते. मात्र आता कंपनीने हाच रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्समध्ये प्रचंड नाराजी होती. जिओनंतर आता आणखी एका कंपनीने त्यांचा लोकप्रिय रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील दुसरी आघाडीची कंपनी असलेल्या एअरटेलने देखील आता युजर्समधील लोकप्रिय रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत देखील 249 रुपये होती, हा एक एंट्री-लेवल रिचार्ज प्लॅ होता. मात्र आता कंपनीने हा प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये कंपनी रोज हाय-स्पीड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएससह अनेक फायदे ऑफर करत होती. मात्र आता युजर्सना या फायद्यांसाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
एयरटेल थँक्स अॅपवर एक नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा रिचार्ज प्लॅन आता 20 ऑगस्ट रोजी रात्री 12:00 वाजल्यापासून उपवब्ध होणार नाही. एयरटेलने सांगितलं आहे की, 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:00 वाजल्यापासून 249 वाला रिचार्ज प्लॅन बंद केला जाणार आहे. खरंतर हा 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन कमी व्हॅलिडीटीमध्ये डेटा बेनिफिट्स आणि कॉलिंगची सुविधा देत होते. हा प्लॅन युजर्समध्ये अत्यंत लोकप्रिय होता. मात्र आता हा रिचार्ज प्लॅन बंद केला जाणार आहे. हा स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद झाल्यामुळे एयरटेलच्या प्रीपेड पोर्टफोलियोमध्ये जास्त किंमतीच्या रिचार्ज प्लॅनचे ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप या प्लॅनसाठी कोणताही ऑप्शन जारी केला नाही. परंतु हे पाऊल टेलिकॉम ऑपरेटर्सनी वापरकर्त्यांना दीर्घ वैधता किंवा जास्त किमतीच्या रिचार्जकडे ढकलण्यासाठी केलेल्या व्यापक बदलाचे प्रतिबिंबित करते असे दिसते.
BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
249 रुपयांचा प्लॅन बंद झाल्यानंतर, यूजर्सना आता 50 रुपये जास्त द्यावे लागतील आणि 299 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन खरेदी करावा लागेल. हा प्लॅन आता एअरटेलचा सर्वात परवडणारा डेटा प्लॅन बनला आहे जो दररोज हाय-स्पीड इंटरनेट, अमर्यादित कॉल आणि इतर अनेक फायदे देत आहे. 299 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला थोडी जास्त वैधता म्हणजेच 28 दिवस मिळतील, तर इतर फायदे 249 रुपयांच्या प्रीपेड पॅकसारखेच असतील. त्याच वेळी, आता व्होडाफोन आयडिया म्हणजेच व्ही ही एकमेव टेलिकॉम कंपनी बनली आहे जी अजूनही 249 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देत आहे.