Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर

Meta New Feature: मेटाने WhatsApp आणि Messenger साठी एक नवीन फीचर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फीचर्स स्कॅमपासून युजर्सची सुरक्षा व्हावी, यासाठी जारी केले जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 27, 2025 | 11:44 AM
आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर

आता WhatsApp आणि Messenger स्वत: देणार स्कॅम अलर्ट! कसं काम करणार नवीन फीचर, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • 21,000 हून अधिक बनावट पेज आणि अकाऊंटवर कारवाई
  • अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रिन शेअर केल्यास मिळणार अलर्ट
  • चॅट्स AI स्कॅम रिव्यूसाठी पाठवण्याचा पर्याय उपलब्ध
टेक कंपनी Meta ने त्यांच्या युजर्सना ऑनलाईन स्कॅम आणि फ्रॉडपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने युजर्सच्या सुरक्षेसाठी काही खास फीचर्स जारी केले आहेत. कंपनीने जारी केलेल्या या नवीन फीचरअंतर्गत युजर्ससाठी संबंधित स्कॅमपूर्वीच अलर्ट जारी केला जाणार आहे. यासोबतच Meta ने यूजर्सचे अकाऊंट सुरक्षित राहावे यासाठी देखील काही नवीन टूल्स आणि फीचर्स सादर केले आहेत.

Youtube आणि Disney मध्ये वाढला तणाव! कंपनीच्या निर्णयाचा युजर्सवर होणार परिणाम, 31 ऑक्टोबरपासून नाही दिसणार हे लोकप्रिय चॅनेल्स

Meta ने सांगितलं आहे की, कंपनीने अलीकडेच फेसबूक आणि इंस्टाग्रामवर म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि यूएई सारख्या देशांमध्ये 80 लाखांहून अधिक स्कॅम नेटवर्क पकडले आहेत. हे स्कॅम्स प्रामुख्याने मेसेजिंग, डेटिंग अ‍ॅप्स, सोशल मीडिया आणि क्रिप्टो प्लेटफॉर्म्सद्वारे सुरु होते. याशिवाय कंपनीने 21,000 हून अधिक बनावट पेज आणि अकाऊंटवर देखील कारवाई केली आहे. हे पेज आणि अकाऊंट लोकांना कस्टमर सपोर्ट असल्याचे भासवून युजर्सकडून माहिती गोळा करत होते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

WhatsApp वर मिळणार स्क्रीन शेयरिंग अलर्ट

Meta आता WhatsApp व्हिडीओ कॉल दरम्यान स्क्रीन शेयरिंग फीचरमध्ये एक नवीन सिक्योरिटी अलर्ट जोडणार आहे. जर एखाद्या युजरने कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत स्क्रिन शेअर केली, तर अ‍ॅपद्वारे त्या युजरला लगेचच अलर्ट जारी केला जाईल. या अलर्टमध्ये लिहीलं असेल की, “तुमची स्क्रीन फक्त तुमच्या विश्वासू लोकांसोबत शेअर करा, कारण यादरम्यान तुम्ही चुकून तुमचे बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती शेअर करू शकता.”

Meta ने सांगितवलं आहे की, “आम्हाला माहिती आहे की स्कॅमर्स सहसा युजर्सवर स्क्रीन शेअर करण्यासाठी दबाव टाकतात, जेणेकरून स्कॅमर्सना बँकिंग किंवा वेरिफिकेशन कोडसारखी वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी मदत होऊ शकेल. हे नवीन टूल यूजर्सना संशयास्पद हालचाली ओळखण्यास मदत करेल. जेणेकरून युजर्सची फसवणूक होणार नाही.”

Chhath Puja 2025: घरबसल्या तयार करा तुमचे आवडते फोटो, महागड्या DSLR चीही गरज नाही! फॉलो करा या टिप्स

Messenger वर लवकरच येणार AI-आधारित स्कॅम डिटेक्शन सिस्टम

Meta आता Messenger साठी देखील नवीन AI-आधारित स्कॅम डिटेक्शन सिस्टमची चाचणी करत आहे. जेव्हा ही प्रणाली सक्रिय केली जाते, तेव्हा चॅटमध्ये संभाव्य घोटाळा किंवा संशयास्पद संदेश आढळल्यास अ‍ॅप यूजर्सना तात्काळ अलर्ट देईल. याशिवाय यूजर्सना त्यांचे अलीकडील चॅट्स AI स्कॅम रिव्यूसाठी पाठवण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जर यामध्ये काही स्कॅम किंवा घोटाळा आढळला तर युजर्सना सामान्य घोटाळ्याच्या पद्धतींबद्दल माहिती दिली जाईल आणि त्यांना ब्लॉक करणे किंवा तक्रार करणे यासारखे उपाय सुचवले जातील. हे नवीन फीचर Messenger साठी कधी जारी केले जाणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. मात्र कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सच्या सुरक्षेत आणखी वाढ होणार आहे.

Web Title: Whatsapp and messenger will automatically tell you about the fraudulent know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 11:44 AM

Topics:  

  • meta
  • Social Media
  • whatsapp update

संबंधित बातम्या

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
1

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
2

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
3

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.