Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

WhatsApp New Update: WhatsApp युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन आणि मोठं अपडेट रिलीज केलं जाणार आहे. हे अपडेट युजर्ससाठी खास ठरणार आहे. कारण यामध्ये युजर्सना चॅटिंगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नसेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 04, 2025 | 01:29 PM
WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

WhatsApp वर येणार मोठं अपडेट! आता चॅटींगसाठी नंबर शेअर करण्याची गरज नाही, प्रत्येक युजरसाठी क्रिएट होणार Username

Follow Us
Close
Follow Us:

मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात 2 बिलीयनहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp मध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल जोडले आहेत. हे बदल इंस्टाग्रामसारखेच आहेत. स्टेटसमध्ये म्युझिक फिचर, फोटोंसाठी लेआऊट, मेंशन इन स्टेटस असे अनेक फीचर्स WhatsApp मध्ये जोडण्यात आले आहेत. या सर्व फीचर्सनंतर आता WhatsApp मध्ये आणखी एक नवीन फीचर लवकरच जोडलं जाणार आहे. हे फीचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील फीचरप्रमाणेच आहे.

जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत

फोन नंबरशिवाय WhatsApp वर मेसेज

जर आपल्याला WhatsApp वर एखाद्या व्यक्तिला मेसेज करायचा असेल किंवा कॉल करायचा असेल तर नंबरची गरज असते. पण आता असं होणार नाही. कारण लवकरच रिलीज केल्या जाणाऱ्या फीचरनंतर युजर्स फोन नंबरशिवाय WhatsApp वर मेसेज करू शकणार आहे. पण यासाठी गरज असेल युजरनेमची. WhatsApp मध्ये आधीपासूनच अनेक फीचर्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये डिसअपीयरिंग मेसेजेस, चॅट लॉक आणि इतर अनेक अपडेट्सचा समावेश आहे. या सर्व फीचर्सनंतर आता WhatsApp मध्ये एक नवीन फीचर जोडलं जाणार आहे. हे फीचर असणार आहे ‘WhatsApp यूजरनेम’. कंपनी या फीचरची चाचणी करत आहे. या फीचरनंतर युजर्स फोन नंबर शेअर केल्याशिवाय चॅटिंग करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

लवकरच युजर्ससाठी रोलआऊट होणार नवं फीचर

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp च्या बीटा वर्जन (2.24.18.2) मध्ये हे फीचर आढळलं आहे. सध्या हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आलेलं नाही. मात्र अशी आहे की, लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे. एकदा हे फीचर रिलीज झाल्यानंतर युजर्स फोन नंबर शेअर न करता मेसेज करू शकणार आहेत. हे फीचर युजर्ससाठी प्रचंड फायद्याचं ठरणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देखील हे फीचर युजर्सना मदत करणार आहे.

फोन नंबरशिवाय चॅटिंग करणं होणार सोपं

2009 मध्ये स्टेटस अपडेट अ‍ॅप म्हणून लाँच झालेल्या व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात 2 अब्जाहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. कंपनी व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक फीचर्स आणत राहते. आता लवकरच WhatsApp यूजरनेम सुरु करणार आहे. ज्यामुळे युजर्स त्यांचं अकाऊंट हँडल तयार करू शकणार आहेत. हे टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या अकाऊंट हँडलप्रमाणेच असणार आहे. हे फीचर रिलीज झाल्यानंतर फोन नंबरशिवाय चॅटिंग करणं सोपं होणार आहे. एक यूजर दुसऱ्या युजरला यूजरनेमचा वापर करून सर्च करू शकणार आहे. हे विशेषतः ग्रुप चॅटमध्ये किंवा तुम्हाला अनोळखी लोकांशी कनेक्ट होताना उपयुक्त ठरू शकते.

एआय अँकरचा जमाना गेला, आता या देशाने तयार केला चक्क AI Reporter! मानवी न्यूज रिपोटर्सपेक्षा किती वेगळा?

असे म्हटले जात आहे की WhatsApp चा वापर अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी, कंपनी WhatsApp यूजर नेमसाठी काही नियम सेट करू शकते. यामध्ये www ने सुरू न होणारे यूजर नेम, फक्त लोअरकेस अक्षरे असणे इत्यादींचा समावेश आहे.

Web Title: Whatsapp is going to launch new update soon now users will get unique username tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.