जाहिरात उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी Meta सज्ज, प्रोडक्शन क्रूशिवाय जाहिरात तयार करण्याचे उद्दिष्ट! AI करणार मदत
मेटा प्लॅटफॉर्म्स जाहिरात उद्योगात मोठा बदल करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी जाहिराती तयार करण्याच्या आणि वितरित करण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल करणार आहे. जाहिरात उद्योगात आता मेटा पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेटा 2026 च्या अखेरपर्यंत जाहिरातदारांना AI – टेक्स्ट, विजुअल, व्हिडिओ आणि टार्गेटिंगचा वापर करून पूर्णपणे जाहिरात तयार करण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
जाहिराती हा पूर्वीपासूनच मेटाच्या व्यवसायाचा एक मुख्य भाग आहे. आता CEO मार्क झुकरबर्ग AI ला केवळ व्यवसाय करण्याचा एक मार्ग मानत नाहीत तर त्यांच्या मते AI बदल घडवण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. झुकरबर्गने मेटाच्या अॅनुअल शेयरहोल्डर मीटिंगमध्ये सांगितलं होतं की, भविष्यात, आम्हाला व्यवसायांनी त्यांचे मार्केटिंग उद्दिष्टे सांगावीत अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांच्यासाठी उर्वरित काम करू. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात एक छोटा बिजनेस प्रोडक्ट फोटो अपलोड करेल, मार्केटिंग गोल आणि बजेट देखील सांगेल आणि मेटाचा AI पूर्ण जाहिरात कॅम्पेन तयार करणार आहे. AI फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्लेसमेंट आणि टारगेटिंग मॅनेज करणार आहे, ज्यामध्ये ऑडियंस, लोकेशन आणि हवामानाच्या हिशोबाने बदल केले जातील.
मेटाची कल्पना यशस्वी झाली तर त्याचा सर्वात जास्त फायदा लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना किंवा मेटाच्या बहुतेक जाहिरातदारांना होणार आहे. कारण अशा व्यवसायिकांकडे मोठ्या मोहिमांसाठी बजेट किंवा क्रिएटिव रिसोर्स नसतात. मेटाचे AI रिअल-टाइममध्ये जाहिरातीचे वेरिएशन्स तयार करेल, युजर्सच्या लोकेशन किंवा कॉन्टेक्स्टनुसार प्रतिमा आणि मेसेजिंग तयार करेल. उदाहरणार्थ, बर्फाळ भागात कारची जाहिरात डोंगराळ रस्त्यावर दिसेल, तर शहरात, तीच कार शहरी वातावरणात दिसेल.
AI जाहिरातींच्या शर्यतीत मेटा एकटा नाही. गूगलने अलीकडेच त्यांचे Veo व्हिडीओ जनरेशन टूलचे नवीन वर्जन लाँच केले आहे. हे टूल साधारण टेक्स्ट प्रॉम्प्ट्सपासून व्हिडीओ जाहिरात तयार करते. OpenAI चा DALL·E आणि Midjourney सारख्या दूसऱ्या AI टूल्सचा आधीपासूनच ब्रँड्सद्वारे इमेज-बेस्ड कॅम्पेन कंटेंट जनरेटसाठी वापर केला जात आहे. फास्ट प्रोग्रेस असून देखील, AI-जनरेटेड जाहिराती अजूनही परफेक्ट नाही. मार्केटर्स म्हणतात की, उपलब्ध असलेले टूल्स अनेकदा लो-क्वालिटी विजुअल्स तयार करतात. वैयक्तिक ब्रँडसाठी तयार केलेले एआय मॉडेल तयार करण्यासाठी उच्च संगणकीय शक्तीची देखील आवश्यकता असते, ज्यामुळे टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी वाढते.