
WhatsApp वर इंस्टाग्राम रील्स शेअर करण्याचा अनुभव बदलणार! चॅटमध्ये लवकरच येणार नवीन पर्याय... कसं करणार काम? जाणून घ्या
यूजर्सना चॅटमध्ये एक रिल्स बटन दिले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. या बटनवर टॅप करून यूजर्स अलीकडेच पाहिलेल्या, सेव्ह करण्यात आलेल्या आणि लाईक केलेल्या रिल्स ब्राऊझ करू शकणार आहेत. हे फीचर सध्या निवडक बीटा यूजर्ससाठी रोलआऊट केले जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
WABetaInfo ने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, गूगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲप बेटा फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.42.9 डाऊनलोड केलेल्या व्हॉट्सॲप यूजर्सना हा पर्याय मिळणार आहे. चॅटमध्ये मिळणारे हे नवीन रिल्स बटन यूजर्सना थेट त्यांच्या इंस्टाग्राम ॲक्टिव्हिटीवर घेऊन जाणार आहे. येथे यूजर्सना अलीकडेच पाहिलेल्या सर्व रिल्स दिसणार आहेत, तसेच लाईक केलेल्या आणि सेव्ह करण्यात आलेल्या रिल्स देखील यूजर्सना येथे दिसणार आहेत. यापैकी कोणत्याही सेक्शनवर क्लिक करून रिल निवडून थेट व्हॉट्सॲप चॅटमध्ये सेंड केली जाऊ शकते.
व्हॉट्सॲपच्या नव्या शॉर्टकर्ट फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सचे व्हॉट्सॲप अकाऊंट मेटाच्या अकाऊंट सेंटरला लिंक असणं गरजेचं आहे. जर एखादा यूजर त्याचे व्हॉट्सॲप अकाऊंट इंस्टाग्राम आणि फेसबूकपासून वेगळे ठेवत असेल, तर अकाऊंट लिंक न करता पूर्वीप्रमाणेच ॲपचा वापर करून रिल्स शेअर करू शकतात. मात्र यामुळे यूजर्सना चॅट अटॅचमेंट मेन्यूमध्ये रिल्स बटन दिसणार नाही.
व्हॉट्सॲप आधीपासूनच मीडिया पिकरद्वारे इंस्टाग्राम आणि फेसबूक स्टोरीज, पोस्ट्स आणि रिल्स शेअर करण्याची सुविधा देते. मात्र यासाठी यूजर्सना पिकर ओपन करून वेगवेगळ्या पर्यायांची निवड करावी लागते. मात्र नव्या शॉर्टकट रील्सना अटॅचमेंट मेन्यूमध्येच एक वेगळे बटन दिसणार आहे. यामुळे कोणत्याही जास्तीच्या स्टेप्स फॉलो न करता एका क्लिकमध्ये व्हिडीओ शेअर केला जाऊ शकतो. हे फीचर व्हॉट्सॲप बेटा फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.42.9 वर्जनमध्ये आढळले आहे. सध्या हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. इतर यूजर्ससाठी हे फीचर कधी रोलआऊट केलं जाणार याबाबत अद्याप माहिती शेअर करण्यात आली नाही.
Ans: या फीचरमुळे यूजर्सना व्हॉट्सॲप चॅटमधील अटॅचमेंट मेन्यूमधून थेट Instagram Reels निवडून शेअर करता येणार आहेत.
Ans: हे बटन व्हॉट्सॲपच्या चॅटमधील अटॅचमेंट मेन्यूमध्ये उपलब्ध होणार आहे.
Ans: यूजर्सना अलीकडे पाहिलेल्या, लाईक केलेल्या आणि सेव्ह केलेल्या Instagram Reels निवडून शेअर करता येतील.