Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

अँड्रॉईड यूजर्ससाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच काही जुन्या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप कायमचं बंद होणार आहे, ज्यामुळे लाखो यूजर्सवर परिणाम होऊ शकतो. याबाबत कंपनी त्यांच्या यूजर्ससाठी अलर्ट जारी करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 28, 2026 | 02:08 PM
Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

Follow Us
Follow Us:
  • 8 सप्टेंबर 2026 पासून अँड्रॉईड 6.0 पेक्षा जुन्या वर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट पूर्णपणे बंद होणार आहे.
  • Android 5.0 आणि 5.1 वापरणाऱ्या यूजर्सना अ‍ॅप वापरता येणार नाही, त्यामुळे अपडेट किंवा नवीन फोन घेणं आवश्यक आहे.
  • यूजर्सनी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेत चॅट बॅकअप घेणं आणि डिव्हाईस अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे
तुम्ही देखील अँड्रॉईड यूजर आहात का? तुम्ही देखील तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता का? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी किमान सिस्टिम आवश्यकता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक अँड्रॉईड स्मार्टफोनवर आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर कायमचा बंद होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, 8 सप्टेंबर 2026 पासून अँड्रॉईड 6.0 पेक्षा जुन्या वर्जनवर व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट पूर्णपणे बंद केला जाणार आहे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर जर तुम्ही अँड्रॉईड 5.0 किंवा 5.1 वर चालणारा स्मार्टफोन वापरत असाल तर आता तुमच्या डिव्हाईसवरील व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट देखील बंद होणार आहे.

टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

कंपनीने का घेतला हा निर्णय?

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स रोलआऊट करत असते. या फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा असं कंपनीचं उदिष्ट असतं. पण नवीन फीचर्ससोबतच चांगल्या परफॉर्मंससाठी अ‍ॅप अपडेट ठेवणं देखील तितकंच महत्त्वांचं असतं. कारण अँड्रॉइडचे जुने वर्जन आणि कमकुवत हार्डवेअर यांमुळे हे नवीन फीचर्स व्यवस्थित चालवणे अवघड होऊ शकते. याच कारणामुळे आता कंपनीने थेट जुन्या अँड्रॉईड वर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, भारत, ब्राजील, पाकिस्तान आणि अनेक आशियाई आणि आफ्रीरेतील देशांमध्ये आजही मोठ्या संख्येने यूजर्स जुन्या अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा लाखो यूजर्सवर परिणाम होऊ शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपने जारी केला अलर्ट

मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने आधीच यूजर्सना अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ओपन करताच यूजर्सना एक नोटिफिकेशन पाहायला मिळते. यामध्ये सांगितलं जातं आहे की, 8 सप्टेंबर 2026 नंतर ही सर्विस बंद होणार आहे.

Weather Alert Apps: अचानक बदलतंय हवामान! चिंता सोडा, आत्ताच डाऊनलोड करा हे अ‍ॅप… क्षणोक्षणी मिळणार लाईव्ह अलर्ट्स

जर तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 6.0 किंवा त्यावरील वर्जन इंस्टॉल असेल, चिंता करण्याची गरज नाही. कारण कंपनीच्या निर्णयाचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि तुमच्या फोनमधील व्हॉट्सअ‍ॅप पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. तसेच आयफोन आणि आयपॅड यूजर्सवर देखील कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.

आत्ताच करा हे काम

जर तुम्ही अँड्रॉईड 5.0 किंवा 5.1 वर चालणारा स्मार्टफोन वापरत असाल तर त्वरित अपडेट करा. तुमच्या फोनवर अपडेट उपलब्ध नसल्यास, नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हाच एकमेव पर्याय आहे. तसेच, तुमचे सर्व चॅट्स सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी, आताच त्यांचा बॅकअप घ्या.

Web Title: Whatsapp to stop working on older android phones from september 8 2026 check if your device is affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
1

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
2

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
3

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
4

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.