टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर
टेक कंपनी विवोने त्यांचे नवीन डिव्हाईस 8GB+128GB, 8GB + 256GB, 8GB + 512GB, 12GB + 256GB आणि 12GB+512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये, 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये ठेवली आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसच्या 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,899 म्हणजेच सुमारे 40,000 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये 5 मेपासून सुरु होणार आहे. हा फोन ब्राईट मून ब्लॅक, फ्लोटिंग गोल्ड, स्टार व्हायोलेट आणि व्हॅस्ट ब्लू या रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वीवोच्या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.83-इंच (1,260 x 2,800 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. विवोचा हा फोन IP68 + IP69 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. वीवो वाय 600 प्रोमध्ये 6nm ऑक्टो-कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 7300e चिपसेट दिला आहे. यासोबतच ग्राफिक्स सपोर्टसाठी या स्मार्टफोनमध्ये एआरएम माली-जी610 जीपीयू, 12GB पर्यंत एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB चे यूएफएस 3.1 स्टोरेज दिले आहे. हा फोन अँड्रॉईड 16 पर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो.
फोटोग्राफईसाठी कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. 10x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
वीवो वाय 600 प्रो मध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 10,200mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाई-फाई 6, ब्लूटूथ 5.4, आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. या फोनमध्ये आयआर ब्लास्टर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे अनेक सेन्सर्स देखील आहेत.






