Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. हे वैशिष्ट्य विशेषतः स्पॅम आणि पुनरावृत्ती होणाऱ्या मेसेजिंग अकाउंट्सना आळा घालण्यासाठी विकसित केले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2025 | 01:00 PM
WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम

WhatsApp Update: Spam ला लागणार ब्रेक! मेसेजिंग प्लॅटफॉर्म लागू करणार मंथली मेसेज लिमिट, असे असतील नियम

Follow Us
Close
Follow Us:

व्हाट्सअ‍ॅप त्यांच्या युजरसाठी नेहमीच नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. हे फीचर्स आणि अपडेट्स सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी जारी केले जातात. आता पुन्हा एकदा व्हाट्सअपने त्यांच्या युजरसाठी पुन्हा एक नवीन फिचर लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या फीचरमध्ये नको असलेले मेसेज थांबवण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. सध्या कंपनी एका नवीन फीचरची टेस्टिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे नवीन फीचर युजर्स आणि व्यवसायात पाठवलेल्या मेसेजची लिमिट ठरवणार आहे. हे असे मेसेज असणार आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये अ‍ॅड आहेत आणि युजर्सना या मेसेजचे उत्तर देखील द्यायचे नाही.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा धमाका! मित्रांचे स्टेटस होणार नाही तुमच्या नजरेआड, असं आहे नवं फीचर

जारी करण्यात येणाऱ्या नव्या फीचर्सचा उद्देश यूजर्सना एक व्यवस्थित इनबॉक्स ऑफर करणे असा आहे. सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये व्हाट्सअ‍ॅप एका साधारण चॅट ॲपमधून एका मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये डेव्हलप झाला आहे. त्यामध्ये कम्युनिटी बिजनेस अकाउंट आणि कस्टमर सर्विस चॅनल यांचा समावेश आहे. वाढीसह व्हाट्सअपवर नको असलेले मेसेज आणि प्रमोशन मेसेजची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे अनेक युजर्सना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. समस्या लक्षात घेऊन आता व्हाट्सअ‍ॅपने एक नवीन फिचर जारी करण्याचा विचार करत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मिळालेल्या अहवालानुसार, व्हाट्सअ‍ॅप आता अशा लोकांची मंथली मेसेज लिमिट ठरवणार आहे जे युजर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आणि जे सतत मेसेज करत असतात. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला मेसेज केला ज्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्ही अ‍ॅड नाही तर अशा व्यक्तीसाठी तुमची मेसेज लिमिट ठरवली जाणार आहे.

उदारणार्थ, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तीन मेसेज पाठवले आणि त्या व्यक्तीने त्या मेसेजची उत्तर दिले नाही तर त्या महिन्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मेसेजचा वापर तुम्ही केला आहे. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला त्यानंतर त्या महिन्यात मेसेज करू शकत नाही. पण जर समोरच्या व्यक्तीने तुमच्या मेसेजचे उत्तर दिले तर ही समस्या उद्भवणार नाही. सध्या कंपनीने नवीन फीचरबाबत जास्त माहिती दिलेली नाही. कंपनीने सांगितलं आहे की, कंपनी सध्या वेगवेगळ्या लिमिटबाबत चाचणी करत आहे. या मेसेजच्या मंथली लिमिटपर्यंत पोहोचल्यानंतर युजर्सना एक नोटिफेकेशन पाठवलं जाणार आहे. एकदा ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहोचले की, त्यांना नवीन संपर्कांना संदेश पाठवण्यापासून तात्पुरते ब्लॉक केले जाऊ शकते.

WhatsApp Tips: हिंदी-मराठीसह या भाषांमध्ये वापरू शकता लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप, ही आहे सर्वात सोपी Trick

व्हाट्सअ‍ॅपने सांगितलं आहे की, सामान्यतः मित्र आणि कुटुंबाशी चॅट करणाऱ्या नियमित यूजर्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे नवीन वैशिष्ट्य स्पॅम कमी करण्यासाठी WhatsApp च्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे, विशेषतः भारतात, जिथे या प्लॅटफॉर्मचे 50 करोडहून अधिक यूजर्स आहेत.

गेल्यावर्षी व्हाट्सअ‍ॅपने अनेक अँटी-स्पॅम टूल सादर केले होतं. ज्यामध्ये मार्केटिंग मेसेजवर प्रतिबंध, व्यावसायिक चॅटसाठी सदस्यता समाप्त करण्यासाठी ऑप्शन आणि ब्रॉडकास्टिंग मेसेजवर सिमा असणार आहेत. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या व्यवसायांना आता मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्याऐवजी खरे संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

Web Title: Whatsapp update now company will release new rule about the message limit tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स
1

Diwali 2025: दिवाळी पार्टी आणखी होणरा खास, आजच खरेदी करा हे 5 बेस्ट Bluetooth स्पीकर्स, मिळणार दमदार साउंड आणि शानदार वाइब्स

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय
2

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत तुमच्या भावडांना करा खूश, हे खास गिफ्ट प्रत्येकासाठी ठरतील अविस्मरणीय

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या
3

WhatsApp युजर्सना झटका! Meta ने घेतला मोठा निर्णय, ChatGPT च्या वापरावर लागणार ब्रेक? कारण जाणून घ्या

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या
4

Apple iPhone Air: भारताच्या शेजारी देशात लाँच होताच Out of Stock झाला Apple चा हा मॉडेल, नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.