Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी! Status पोस्ट केल्यावरही ही चूक दुरुस्त करता येणार, कंपनी लाँच करणार नवे फिचर

WhatsApp Edit Caption Feature : व्हॉट्सॲप लवकरच आपल्या यूजर्ससाठी एक भन्नाट आणि कामाचे फिचर घेऊन येणार आहे. हे फिचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध असून लवकरच सर्व यूजर्सना याचा वापर करता ये

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2026 | 10:05 AM
WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी! Status पोस्ट केल्यावरही ही चूक दुरुस्त करता येणार, कंपनी लाँच करणार नवे फिचर

WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी! Status पोस्ट केल्यावरही ही चूक दुरुस्त करता येणार, कंपनी लाँच करणार नवे फिचर

Follow Us
Follow Us:
  • लोकप्रिय मेसेजिंग ॲप आपल्या यूजर्ससाठी एक असे फिचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे स्टेटस वापरणे अधिक सोपे होणार आहे.
  • सध्या एका छोट्या अडचणीमुळे यूजर्सना वारंवार स्टेटस पुन्हा पोस्ट करावे लागते, मात्र ही समस्या लवकरच दूर होऊ शकते.
  • नवीन अपडेटची चाचणी सुरू असून ते उपलब्ध झाल्यानंतर यूजर्सचा अनुभव आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
तुम्हीही व्हाट्सॲप यूजर असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. व्हाट्सॲप हे एक मेसेजिंग ॲप आहे जिथे लोक आपल्या संपर्कातील लोकांसोबत संभाषण करु शकतात, त्यांच्यांसोबत फोटो, व्हडिओ शेअर करु शकतात. यात काॅलिंग, व्हिडिओ काॅलिंग, तसेच स्टेटस ठेवण्याचाही पर्याय उपलब्ध असतो. व्हाट्सॲपमधील स्टेटस हे फिचर लोकांमध्ये फार लोकप्रिय आहे. यात आपण आपल्या आवडीचे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करु शकतो जे २४ तासांपर्यंत स्टेटसमध्ये राहतात.

चार्जिंगची चिंता संपली! २० दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देणार Latest Smart Watch, जाणून घ्या नव्या स्मार्ट वॉचची खासियत

यूजरचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी कंपनी नवनवीन फिचर घेऊन येत आहे. मागेच कंपनीने स्टेटसमध्ये म्यूजिक ॲड करण्याचे फिचर आणले होते ज्याचा वापर यूजर्स मोठ्या प्रमाणात करत आहेत. तुम्ही व्हाट्सॲप स्टेटसचा वापर करत असल्यास यात एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की स्टेटसला जेव्हा आपण कॅप्शन देतो आणि पोस्ट करतो त्यानंतर या कॅप्शनमध्ये आपल्याला काहीच बदल करता येत नाही, म्हणजेच आपल्याकडून जर कॅप्शनमध्ये काही चुका झाल्या तर त्या आपल्यायाला दुरुस्त करता येत नाही. यामुळे चुक लक्षात आल्यांनतर पोस्ट केलेला व्हाट्सॲप स्टेटस यूजर्सनाडिलीट करुन पुन्हा पोस्ट करायला लागायचा. हिच गोष्ट लक्षात घेत कंपनीने आता यूजरच्या कामाचे नवीन फिचर लाँच केले आहे.

व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WaBetaInfo या वेबसाइटच्या अहवालानुसार, व्हाट्सॲपची पॅरंट कंपनी एका अशा नव्या फिचरवर काम करत आहे ज्याच्या मदतीने यूजर स्टेटस पोस्ट केल्यानंतरही त्याला एडिट करु शकणार आहेत. माहितीनुसार, हे नवीन फिचर सध्या व्हाट्सॲपच्या बीटा व्हर्जनवर दिसून येत आहे आणि यावर अद्याप काम सुरु आहे. जर हे फिचर लाँच करण्यात आले तर यूजर्सना कॅप्शनमधील आपल्या लहान चुकांसाठी पूर्ण स्टेटस डिलीट करण्याची गरज लागणार नाही.

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज… जाणून घ्या सविस्तर

एडिट करता येणार व्हॉट्सॲप स्टेटस

नवे फिचर अद्याप सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नसून लवकरच यूजर्सना या फिचरचा लाभ घेता येणार आहे. सध्या यूजर्सना व्हॉट्सॲप स्टेटस अपलोड केल्यानंतर याच्या कॅप्शनमध्ये बदल करता येत नाहीये. पण काही दिवसांनंतर यूजर्सना स्टेटस पोस्ट केल्यानंतरही कॅप्शनमध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. बीटा व्हर्जनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, यूजर स्टेटस अपलोड केल्याच्या १५ मिनिटांपर्यंत पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये बदल करुन त्याला एडिट करु शकणार आहेत. अशात जर काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा नवे चांगले कॅप्शन द्यायचे असेल किंवा त्यात आणखी काही मजकूर ॲड करायचा असेल तर ते तुम्हाला स्टेटस डिलिट न करताच एडिट करुन यात आवश्यक ते बदल करता येणार आहेत.

 

Web Title: Whatsapp working on new status edit feature for users tech news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन
1

बंपर ऑफर! Samsung Galaxy M17 5G वर मोठी सूट, 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा दमदार 5G फोन

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या
2

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं
3

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
4

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.