लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज... जाणून घ्या सविस्तर
शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा
रियलमी पी4आर स्मार्टफोनची किंमत टिपस्टर संजू चौधरीने शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपकमिंग रियलमी फोनच्या बॉक्सचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील बॉक्सवर मोबाईलची एमआरपी 44,999 रुपये लिहीली आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंटची आहे. ज्यामध्ये 6GB रॅम+ 256GB स्टोरेज ऑफर करण्यात आले आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की ही फोनची एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) आहे, म्हणजेच तो बाजारात 30 हजार ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान आणला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Realme)
फोन रिटेल बॉक्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यामुळे केवळ किंमतच नाही तर आगामी स्मार्टफोनची बॅटरी, चार्जिंग तंत्रज्ञान, स्क्रीन, कॅमेरा आणि डायमेंशनबद्दल देखील माहिती समोर आली आहे. कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन 8000mAh बॅटरीसह लाँच करणार आहे. तर मोठी बॅटरी वेगाने चार्ज करता यावी यासाठी फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाणार आहे.
रियलमी पी4आर 5जी फोनमध्ये 6.8-इंच मोठी स्क्रीन दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फोन बॉक्सनुसार, कंपनीचा आगामी स्मार्टफोन एचडी+ रेजोल्यूशन सपोर्टसह येणाक आहे आणि यूजर्सना यामध्ये हाय 144Hz रिफ्रेश रेटसह 1200 निट्स ब्राइटनेस देखील दिली जाणार आहे. या आगामी रियलमी 5जी फोनची जाडी 8.88 मिमी आणि वजन 224 ग्रॅम असल्याचे सांगितलं जात आहे.
रियलमी पी4आर 5जी स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर दिला जाणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र बॉक्सवरून अशी माहिती मिळत आहे की, या डिव्हाईसमध्ये 5300mm2 एअरफ्लो वेपर कूलिंग चेंबर दिला जाणार आहे. कंपनी त्यांचा हा आगामी स्मार्टफोन 4GB रॅम आणि 6GB रॅम या दोन पर्यायांमध्ये लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे.
फोटोग्राफीसाठी रियलमी पी4आरमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा सेंसर दिला जाणार आहे. यासोबतच 2 मेगापिक्सेलचे सेकेंडरी लेंस देखील मिळणार आहे. अशी आशा आहे की, या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Ans: Realme ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.
Ans: होय, Realme स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि किफायतशीर किंमतीसाठी लोकप्रिय आहेत.
Ans: होय, Realme कडे बजेट, मिड-रेंज आणि प्रीमियम श्रेणीतील अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.






