कोणती कंपनी देते सर्वाधिक सॉफ्टवेअर अपडेट? तुमचा फोन टॉप 5 ब्रँडमध्ये आहे का, जाणून घ्या
सध्या असा एकही व्यक्ति नसेल जो स्मार्टफोनचा वापर करत नाही. आपल्या प्रत्येकाला स्मार्टफोनची प्रचंड गरज असते. स्मार्टफोनशिवाय आपली कामं अडू शकतात. आता स्मार्टफोन हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील एक गरज बनले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या गरजेमुळे कंपन्या देखील नवीन डिझाईनसह स्मार्टफोन लाँच करत आहेत. स्मार्टफोन स्मूद बनवण्यासाठी, कंपन्या वेळोवेळी नवीन सॉफ्टवेअर आणत असतात आणि अनेक कंपन्या जुन्या स्मार्टफोनमध्ये हे सॉफ्टवेअर ओटीए (ओव्हर टू एअर) द्वारे अपडेटही करतात.
हेदेखील वाचा- Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं
देशात फक्त दोनच स्मार्टफोन कंपन्या आहेत ज्या 7 वर्षांसाठी स्मार्टफोनला सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच देतात, या कंपन्या गुगल आणि सॅमसंग आहेत. तुम्ही Google Pixel आणि कोणताही Samsung फोन वापरत असल्यास, तुम्हाला 7 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे एकदा फोन खरेदी केला की तुम्ही तो 7 वर्षांसाठी वापरू शकता.
Apple चे iPhones त्यांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात आणि बहुतेक वापरकर्त्यांना या कारणास्तव आयफोन खरेदी करण्यास आवडतात. शिवाय iPhone मधील सुरक्षा पॅच खूप मजबूत आहे. आयफोनच्या वाढत्या क्रेझविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु Apple आपल्या iPhone मध्ये फक्त 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि सुरक्षा पॅचची सुविधा प्रदान करते आहे. Apple प्रमाणेच चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlus देखील आपल्या फोनमध्ये 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचची सुविधा देते.
हेदेखील वाचा- मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? एअरटेल आणि VI च्या किंमती वाढण्याची शक्यता
सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी पॅचसाठी स्मार्टफोनमध्ये 7 आणि 6 वर्षांचे अपडेट्स पुसेरे असतात. पण एक कंपनी आहे जी फक्त 5 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच देते, ही कंपनी मोटोरोला आहे. जर आपण मार्केट कॅम्पवर नजर टाकली तर मोटोरोलाचे फोन भारतात खूप कमी विकले जातात.
स्मार्टफोनची सिक्युरिटी वाढते
सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोणाचाही फोन सहज हॅक झाला जाऊ शकतो. अशा काळात Cyber Security महत्त्वाची ठरते. त्यामुळे युजर्सच्या डाटाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्सकडे लक्ष देत आहेत.
फोन ऑपरेटींमध्ये बदल
स्मार्टफोन कंपन्यांनी आणलेल्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे आपला स्मार्टफोन ऑपरेट करणं अधिक सोपं होतं.
फोनचा स्पीड वाढतो
स्मार्टफोन कंपन्यांनी आणलेल्या अपडेटमुळे फोनचा स्पीड वाढतो. जर तुम्ही अपडेट केले तर तुमचा फोन आणि त्यातील अॅप्सचा वेग वाढेल.
सॉफ्टवेअर अपडेट न करण्याचे तोटे
जर तुम्ही सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही तर तुमचा डेटा लिक होऊ शकतो किंवा तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हॅकर्स सहज प्रवेश करु शकतात.






