काय सांगता! जुलै महिन्यात पडणार स्मार्टफोनचा पाऊस, मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी या कंपन्या सज्ज
तुम्ही देखील गेल्या काही दिवसांपासून नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? पण कोणता स्मार्टफोन खरेदी करावा, यामध्ये गोंधळले आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात एक दोन नाहीतर तब्बल 8 नवीन स्मार्टफोन बाजारात एंट्री करणार आहे. काही स्मार्टफोनची लाँच डेट देखील कन्फर्म करण्यात आली आहे. तर उर्वरित स्मार्टफोनची लाँच डेट कंपनीद्वारे लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज
तुम्हाला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करायचा असो किंवा फ्लॅगशिप फोल्डेबल, जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण जुलै महिन्यात प्रत्येक रेंजमधील स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. चला तर मग पुढील महिन्यात कोणते स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य – X)
आघाडीच्या टेक कंपन्यापैकी एक असलेली सॅमसंग जुलै महिन्यात त्यांचे 3 नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या गॅलेक्सी अनपॅक्ड ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे 3 नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. या तिन्ही डिव्हाईसमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे आपग्रेड मिळण्याची शक्यता आहे. Galaxy Z Fold 7 आणि Z Flip 7 सह एक नवीन फॅन एडिशन फोल्डेबल देखील लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन Z Flip 7 FE नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलै रोजी Nothing Phone (3) लाँच केला जाणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. 1 जुलै रोजी हा स्मार्टफोन ग्लोबल लेवलवर लाँच केला जाणार आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात प्रीमियम डिव्हाईस असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 दिला जाण्याची शक्यता आहे. यूकेमध्ये या स्मार्टफोनची किंमत £800 म्हणजेच सुमारे 93,000 रुपये असू शकते. तर भारतीय बाजारात या स्मार्टफोनची किंमत 60,000 रुपये ते 65,000 रुपयांच्या रेंजमध्ये असू शकते. विशेष म्हणजेच कंपनीने यावेळी स्मार्टफोनमधून ग्लिफ इंटरफेस काढून टाकलं आहे. ज्यामुळे स्मार्टफोनमध्ये एक बोल्ड डिझाईन बदल पाहायला मिळत आहे.
वनप्लस देखील जुलै महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. जुलै महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या OnePlus समर लॉन्च ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Nord सिरिजीमधील स्मार्टफोन असणार आहेत. पाहिल डिव्हाईस नॉर्ड 5 असू शकते, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8-सीरीज प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर दुसर डिव्हाईस नॉर्ड CE 5 या नावाने लाँच केले जाऊ शकते, ज्यामध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek 8350 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. नॉर्ड 5 ची किंमत सुमारे 30,000 रुपये असू शकते आणि नॉर्ड सीई 5 ची किंमत 25,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात vivo देखील त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये X Fold 5 आणि X200 FE यांचा सामावेश असण्याची शक्यता आहे. Vivo चा आगामी फोल्डेबल फोन 25 जून रोजी चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. यानंतर कंपनी हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी डिव्हाईसमध्ये वीवोने अॅप्पल वॉच आणि iCloud इंटीग्रेशनसाठी सपोर्ट जाहीर केला आहे. ज्यामुळे आपल्याला एक उत्तम क्रॉस-प्लेटफॉर्म कम्पेटिबिलिटी पाहायला मिळणार आहे.
जुलै महिन्यात Nothing चा एक फोन तर वनप्लसचे दोन फोन आणि सॅमसंगचे तीन फोन, शिवाय वीवोचे दोन फोन लाँच केले जाणार आहेत. म्हणजेच पुढील महिन्यात एकूण 8 नवीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. याशिवाय इतर कंपन्या देखील त्यांचे स्मार्टफोन जुलै महिन्यात लाँच करू शकतात.