OnePlus Event: वनप्लस युजर्स तयार आहात ना? 8 जुलै ठरणार खास, कंपनीच्या या गॅझेट्सवरून अखेर उठणार पडदा!
OnePlus Summer Event: वनप्लस युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात कंपनीचा एक मोठा इव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या इव्हेंटमध्ये अनेक नवीन गॅजेट्स लाँच केले जाणार आहेत. वनप्लसच्या या आगामी इव्हेंटची तारीख समोर आली आहे. या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसोबत वायरलेस इयरफोन देखील लाँच केले जाणार आहे. कंपनीने या आगामी इव्हेंटची घोषणा करताना तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.
AI चोरतोय तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती? कोणते टूल्स करतायत तुमची हेरगिरी? जाणून घ्या सर्वकाही
वनप्लसचा आगामी OnePlus Summer Launch Event हा 8 जुलै रोजी दुपारी दोन वाजता आयोजित केला जाणार आहे. या इव्हेंटमध्ये तीन नवे प्रॉडक्ट लाँच केले जाणार आहेत. याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. या नवीन गॅजेट्सच्या लाँचिंगपूर्वी त्यांचे टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या मग आम्ही डिव्हाईसमध्ये one plus बड्स 4 वायरलेस इयरफोन आणि Nord 5 सीरिजच्या दोन स्मार्टफोनचा समावेश असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
OnePlus Nord 5 सिरीजबाबात कंपनीने माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले आहे, आगामी फोन मीड रेंजमध्ये लाँच केले जाणार आहेत. हे फोन मिड रेंज स्मार्टफोनचा सर्वात मोठा अपग्रेड घेऊन येणार आहेत, ज्यामुळे युजर्सना फ्लॅग्शिप ग्रेड पवार मिळणार आहे. तसेच वनप्लस बर्ड्स 4 सोबत युजर्सना फ्लॅगशिप साउंड क्वालिटी ऑफर केली जाणार आहे.
वनप्लसने सांगितलं आहे की, नॉर्ड 5 स्नॅपड्रॅगन 8 सीरीज चिपसेटसह लाँच केली जाणार आहे. या चिपसेटसह लाँच केला जाणारा हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 चिप असणार आहे, जे Nord 4 च्या Snapdragon 7 Plus Gen 3 पेक्षा एक मोठं अपग्रेड असणार आहे. Nord 5 मध्ये 144Hz डिस्प्ले दिला जाण्याची शक्यात आहे. कारण हे डिव्हाईस 144Hz पर्यंतच्या स्पीडवर Call of Duty Mobile आणि Battlegrounds Mobile India (BGMI) ऑफर करत आहे.
OnePlus Nord 5, OnePlus Nord CE5, OnePlus Buds 4 launching on July 8th in India. pic.twitter.com/MXR0QFE62s
— Mukul Sharma (@stufflistings) June 16, 2025
या नवीन OnePlus फोनवर COD मोबाइल 144fps वर चालू शकतो, तर BGMI मध्ये हे फ्रेम इंटरपोलेशन 90fps पर्यंत मर्यादित आहे. याशिवाय, OnePlus LPDDR5X रॅम वापरत आहे. या फोनमध्ये एक खास कुलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. कंपनीने अद्याप Nord CE 5 चे हार्डवेअरबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
Laptop vs Desktop: तुमच्यासाठी कोण ठरणार बेस्ट? खरेदी करण्यापूर्वी इथे जाणून घ्या सर्वकाही
स्मार्टफोनसह कंपनी वनप्लस बड्स 4 देखील लाँच करणार आहे. यामध्ये डुअल ड्राइवर, डुअल DAC, यासोबतच हाय-रेंज LHDC 5.0 आणि 3D ऑडियो सपोर्ट दिला जाणार आहे. इतकंच नाही हे बड्स गेम मोडमध्ये 47ms अल्ट्रा-लो लेटेंसीला देखील सपोर्ट करणार आहेत. हे बड्स जेन ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे कलर ऑप्शनमध्ये लाँच केले जाणार आहेत.