iPhone 17 Series launch: दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच का लाँच होते नवीन iPhone सीरीज? काय आहे Apple चं सिक्रेट, वाचून व्हाल चकित
iPhone 17 launch: Apple iPhone 17 Series सिरीजच्या लाँचिंगची प्रतिक्षा आता संपली आहे. उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये आयफोन सिरीजसह कंपनी इतर अनेक प्रोडक्ट्स लाँच करणार आहे. यामध्ये वॉच आणि एयरपॉड्सचा देखील समावेश असणार आहे.
iPhone 17 Series launch: iPhone 17 Pro Max मध्ये बॅटरीपासून कॅमेऱ्यापर्यंत… होणार हे 5 मोठे अपग्रेड
अनेक टेक कंपन्या दरवर्षी त्यांचे अनेक स्मार्टफोन्स लाँच करत असतात. यातील काही स्मार्टफोन्स प्रिमियम रेंजमध्ये असतात, तर काही स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लाँच केले जातात. मात्र Apple चा विचार केला तर ही कंपनी दरवर्षी त्यांची एकच स्मार्टफोन सिरीज लाँच करते. हा ईव्हेंट फार मोठा असतो. प्रत्येक वर्षी कंपनी सप्टेंबर महिन्यात या ईव्हेंटचे आयोजन करते. याच ईव्हेंटमध्ये कंपनीची नवीन आयफोन सिरीज लाँच केली जाते. सर्व युजर्स या ईव्हेंटची वर्षभर वाट पाहत असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कंपनीने सप्टेंबर महिन्यात त्यांच्या आगामी आयफोन सिरीजच्या लाँच ईव्हेंटचे आयोजन केले आहे. मात्र अशातच आता एक असा प्रश्न निर्माण होत आहे की, कंपनी दरवर्षी केवळ सप्टेंबर महिन्यातच ईव्हेंट का आयोजित करते? दरवर्षी सप्टेंबर महिन्यातच नवीन आयफोन का लाँच केले जातात? याची कारण अद्यापही अनेक लोकांना माहिती नाही. खरं तर यामागील कारण फारच मजेदार आहे.
सप्टेंबर महिन्यात नवीन प्रोडक्ट्स लाँच करून Apple त्यांच्या ग्राहकांना नवीन पर्याय देते. वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थँक्सगिविंग, ब्लैक फ्राइडे, क्रिसमस आणि भारतात दिवाळीसह अनेक सण साजरे केले जातात. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत देखील मोठी वाढ होते. याशिवाय, अमेरिकेत हा बॅक-टू-स्कूल सीजन आहे. अशा परिस्थितीत, तेथील लोक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन डिव्हाईस खरेदी करतात. याच संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनी त्यांची नवीन आयफोन सिरीज सप्टेंबर महिन्यात लाँच करते.
Apple चे आर्थिक वर्ष सप्टेंबरमध्ये पूर्ण होते. त्यामुळेच कंपनी या महिन्यात नवीन प्रोडक्ट्स लाँच करणाऱ्या अधिक प्राधान्य देते. ज्यामुळे वर्षाअखेरीस कंपनीची विक्री वाढत असल्याचं पाहायला मिळतं. यामुळे नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढतो.
कंपनी दरवर्षी जून-ऑगस्ट दरम्यान आयफोनचे मास प्रोडक्शन सुरु करते, जे सप्टेंबरपर्यंत शिखरावर पोहोचते. त्यामुळे, सप्टेंबरमध्ये लाँच होईपर्यंत, कंपनीचा साठा जगभरात स्थिर होतो आणि पुरवठ्याची कोणतीही समस्या येत नाही.
Apple दरवर्षी आयफोन सिरीजच्या लाँचिंगसोबतच नवीन iOS वर्जन देखील लाँच करत असते. खरं तर, जूनमध्ये कंपनीच्या WWDC ईव्हेंटनंतर, डेव्हलपर्सना सप्टेंबरपर्यंत अॅप्स डेवलेप करण्यासाठी आणि चाचणी करण्यासाठी वेळ मिळतो.
2012 मध्ये आयफोन 5 लाँच झाल्यापासून, अॅपल नेहमीच सप्टेंबरमध्ये नवीन सिरीज लाँच करत असते. यामुळे, ही एक परंपरा बनली आहे आणि हा ईव्हेंट देखील खास बनला आहे. यूजर्स, मीडिया आणि स्पर्धक या ईव्हेंटवर लक्ष ठेवतात.